{
  "village_code": "272700040341070000",
  "village_name": "लौळतगाव",
  "taluka_name": "गेवराई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1063,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:08:46Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.नं. 674/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nअर्जदार/वादी गोरक्षनाथ भागवत काळे यांनी अर्ज देवून कळविले कि, त्यांनी मा. दिवाणी न्यायालय (क स्तर) गेवराई ता. गेवराई जि. बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं. 674/2026 गोरक्षनाथ भागवत काळे विरुद्ध भागवत लिंबाजी काळे, बबीता बाबासाहेब देवडे, शोभा नाना खंडागळे, छगाबाई कचरू देवडे, व सुनिता दामोधर प्रभाळे असा दावा दाखल करून त्यांचे एकत्रित कुटुंबातील सामाईक मिळकत असलेले मौजे लोळदगाव ता. गेवराई जि. बीड येथील गट क्र. 6 मधील 0.90 हे.आर. क्षेत्र, गट 7 क्र. मधील 1.28 हे.आर. क्षेत्र, व गट क्र. 9 मधील 1.15 हे.आर. क्षेत्र, आणि गट क्र. 6 मधील बोअरवेल व गट क्र. 7 मधील विहीरीमधील आणेवारीप्रमाणे असलेला हिस्सा इत्यादींमध्ये सरस निरस मनाने वाटणी करून स्वतंत्र ताबा मिळणे बाबत दावा दाखल केला होता.\nवादी व प्रतिवादी यांनी दिनांक 12/09/2026 रोजी सदरच्या दाव्यामध्ये आपसांत तडजोड केली आहे. सदर तडजोडीनुसार वादी/अर्जदार व प्रतिवादी यांनी वर उल्लेखित मिळकती खालीलप्रमाणे आपसांत वाटून घेतल्या आहेत.\nअर्जदार/वादी गोरक्षनाथ भागवत काळे यांना गट क्र. 6 मधील 0.90 हे.आर. क्षेत्र बोअरवेलसह, व गट क्र. 9 मधील 1.15 हे.आर. क्षेत्र वाटप करून देण्यात आले. गट क्र. 9 मधील 1.15 हे.आर. क्षेत्र हे पूर्वीपासूनच अर्जदार यांचे नावे नोंद आहे तसेच गट नं 6 मधील दाव्यामध्येनमूद असलेले 0.90 हे आर क्षेत्र हे आज रोजी अर्जदार/वादी यांची मयत आई कै सुभद्राबाई भागवत काळे यांचे नावे नोंद असून तडजोडपत्राप्रमाणे अर्जदार/वादी गोरक्षनाथ भागवत काळे यांचे नावावर बोअरवेलसह हस्तातरीत केले.\nप्रतिवादी क्र. भागवत लिंबाजी काळे यांना गट क्र. 7 मधील 1.28 हे.आर. व पो. ख. 0.15 हे.आर. क्षेत्र स्वतंत्र विहिरीसह वाटप करून देण्यात आले असून प्रस्तुत चे क्षेत्र भागवत लिंबाजी काळे यांचे नावे पूर्वी पासूनच नोंद आहे.\nप्रतिवादी क्र. 2 ते 5 बबीता बाबासाहेब देवडे, शोभा नाना खंडागळे, छगाबाई कचरू देवडे, व सुनिता दामोधर प्रभाळे यांनी वर नमूद मिळकतीमधील हक्क गोरक्षनाथ भागवत काळे व भागवत लिंबाजी काळे यांचे हक्कामध्ये मा. न्यायालयासमक्ष सोडून दिले आहेत.\nअर्जदार यांनी रे.दि.दा.नं. 674/2026 मधील निकालानंतर सदर दस्त/हुकूमनामा हा. मुद्रांकजिल्हाधिकारी बीड यांच्याकडे दिनांक 30/09/2026 रोजी नोंदवला असून त्याचे चलन/पावतीक्र. EVN 872/2026 (MH011112109202627E) असा आहे. अर्जासोबत रे.दि.दा.नं. 674/2026 ची प्रत, तडजोडपत्र,त्यावरील आदेश, हुकूमनामा व चलन/पावती क्र. EVN 872/2026, ७/१२ व फेरफार जोडले असून तडजोडपत्राप्रमाणे फेरफार नोंदवावा अशी अर्जदार यांनी विनंती केली असता अर्जदार यांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मिनल नामदेव खांदे"
}
