{
  "village_code": "272700060342790000",
  "village_name": "कवडगांव (बु)",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:25:13Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअ.पा.क. शेरा कमी करणे\nअर्जदार :- बालासाहेब आत्माराम चांभारे रा.कवडगाव ता.वडवणी यांनी अर्ज, जि.प.प्रा.शा. कवडगाव ता.वडवणी यांचेकडील प्रवेश-निर्गम उतारा, दोन्ही नावाचे एकच व्यक्ती व आधार कार्ड सत्यप्रत देऊन कळवले की, बालासाहेब आत्माराम चांभारे यांच्या मौजे कवडगाव शिवारात जमीन मिळकत ग.न 80 चे ७/१२ वर बाळासाहेब आत्माराम चांभारे अ.पा.क. आत्माराम चांभारे म्हणून असलेली अ.पा.क नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज दिला आहे. जि.प.प्रा.शा. कवडगाव ता.वडवणी यांचेकडील प्रवेश-निर्गम उता-यावर बालासाहेब आत्माराम चांभारे यांचा जन्म दिनांक 25.06.1987 असा आहे. तसेच त्याच्या 7/12 वर बाळासाहेब आत्माराम चांभारे असे नाव असुन प्रवेश-निर्गम उतारा, व आधार कार्ड सत्यप्रतवर बालासाहेब आत्माराम चांभारे असे नाव आहे. बाळासाहेब आत्माराम चांभारे व बालासाहेब आत्माराम चांभारे हे दोन्ही नावे एकाच व्यक्तीचे असलेबाबत शपथपत्र अर्जासोबत जोडले आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले करिता वरील कागदपत्रे दिल्यावरुन नोंद घेऊन माहितीस्तव सादर.",
  "talathi": "राजा रतन भदर्गे"
}
