{
  "village_code": "272700070344160000",
  "village_name": "लोणी (शहाजहानपुर)",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:50:17Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती मधील खातेदार श्री. शेषराव किसन पैठणे यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा बीड येथून किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेंतर्गत कर्जमर्यादा घेतलेली होती. सदर कर्जखाते बंद झाले असून त्यांच्याकडे कोणतीही थकबाकी शिल्लक नसल्याचे नमूद करून युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा बीड यांनी दिनांक 14/10/2026 रोजीच्या संदर्भ क्रमांक 56750/2026 अन्वये संबंधित शेतजमिनीवरील बँकेचा बोजा कमी करण्यास हरकत नसल्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. सदर प्रमाणपत्रानुसार मौजे लोणी (शहाजानपूर), ता. जि. बीड येथील गट क्रमांक 205 वरील फेरफार नोंद क्रमांक 1028 अन्वये दाखल असलेला युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा बीड यांचा बँक बोजा कमी करण्यासाठी बँकेचे पत्र आले वरून गाव अभिलेखात नोंद केली.",
  "talathi": "प्रमोद राम कोळपकर"
}
