{
  "village_code": "272700070345070000",
  "village_name": "देवीबाभळगाव",
  "taluka_name": "बीड",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:18:10Z",
  "surveys": [
    "486"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे देवीबाभूळगाव येथील गट क्रमांक 486 या मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कातील सदर जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया, चौसाळा शाखा यांचा रुपये 1,50,000/- (अक्षरी रुपये एक लाख पन्नास हजार फक्त) इतक्या रकमेचा बँक बोजा नोंदविण्यात आलेला आहे.\nयाबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया, चौसाळा शाखा यांनी दिनांक 29/09/2026 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे की, त्यांच्या बँकेच्या प्रणालीतील अभिलेखानुसार श्री. दिगंबर भगवत जोगदंड यांच्या नावाने व आधार क्रमांकाच्या आधारे रुपये 1,50,000/- च्या कर्जाची नोंद आढळून येत नाही. त्यामुळे सदर गट क्रमांक 486 वरील रुपये 1,50,000/- चा बँक बोजा हा त्यांच्या बँकेचा असल्यास तो कमी करण्याबाबत संबंधित तलाठी कार्यालयास विनंती केलेली आहे.\nत्याअनुषंगाने बँकेचे प्राप्त पत्र व उपलब्ध महसुली अभिलेखांची पडताळणी करून, सदर बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया, चौसाळा शाखेशी संबंधित असल्याची खात्री झाल्यानंतर तसेच नियमानुसार संबंधितांना नोटीस बजावून हरकती प्राप्त झाल्यास त्यांचा निपटारा करून सदर रुपये 1,50,000/- चा बँक बोजा कमी करण्याची नोंद घेण्यात येत आहे",
  "talathi": "के.आर.निर्मळ"
}
