{
  "village_code": "272700100347480000",
  "village_name": "रेवली",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2302,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:12:04Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 184/2025\nआदेश दिनांक : 08/10/2025\nमा. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, परळी वैजनाथ, जि. बीड यांच्या न्यायालयातील दिवाणी दावा क्र. 184/2025 मध्ये दिनांक 18/06/2025 रोजी झालेल्या तडजोडीच्या अनुषंगाने वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये जमीन वाटपाबाबत तडजोड झाली आहे.\nवादी व प्रतिवादी हे एकाच हिंदू कुटुंबातील सदस्य असून, मौजे रेवती, ता. परळी वैजनाथ, जि. बीड येथील गट क्रमांक 143 मधील एकूण क्षेत्र 00 हे. 57 आर जमीन त्यांच्या संयुक्त / सामाईक नावाने महसूल अभिलेखात नोंद आहे.\nसदर जमिनीपैकी वादी ज्ञानेश्वरी गोविंद मुंडे यांना क्षेत्र 00 हे. 28.50 आर जमीन देण्यात आलेली असून, उर्वरित क्षेत्र 00 हे. 28.50 आर जमीन प्रतिवादी क्र. 2 मंदाकिनी व्यंकटी कराड यांना देण्याचे तडजोडीत मान्य करण्यात आले आहे. तसेच गंगाबाई बब्रुवान कांदे यांनी सदर जमिनीचे हक्क सोडून दिले आहेत.\nत्याअनुषंगाने मा. न्यायालयातील तडजोडीच्या आदेशानुसार व डिक्रीनुसार मौजे रेवती, ता. परळी वैजनाथ, जि. बीड येथील गट क्र. 143 मधील वादी व प्रतिवादी यांच्या हिश्श्याप्रमाणे क्षेत्राची विभागणी करून संबंधितांच्या नावे स्वतंत्र हक्क नोंद करण्यासाठी सदर फेरफार नोंद घेण्यात येत आहे. ती मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन कुंडलिकराव साबळे"
}
