{
  "village_code": "272700100347640000",
  "village_name": "कौठळी",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6104,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:46:42Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक 94/इनाम/BD/7884\nआदेश दिनांक : 28/07/2026\nविरासत फेरफार नोंद\nउपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, परळी वैजनाथ यांचे न्यायालयातील संकीर्ण प्रकरण क्रमांक 94/इनाम/BD/7884 मधील निर्णय दिनांक 28/07/2026 रोजीच्या आदेशानुसार मौजे कौठळी ता. परळी वैजनाथ जि. बीड येथील गट क्रमांक 175 मधील क्षेत्र 09 हे. 16 आर या इनाम जमिनीबाबत वारस नोंद मंजूर करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.\nमयत इनामदार किशन गणपतराव कटकर यांचे दिनांक 26/08/1969 रोजी निधन झालेले असून, त्यांच्यानंतर त्यांचे वारस बालासाहेब किशन कटकर यांचे नाव वारस म्हणून नोंदविण्याबाबत उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ यांनी वरील आदेशान्वये मंजुरी दिलेली आहे.\nसदर आदेशानुसार मौजे कौठळी येथील गट क्रमांक 175 मधील क्षेत्र 09 हे. 16 आर ही जमीन देवस्थानची सेवा व चाकरी करण्याच्या अटीवर बालासाहेब किशन कटकर यांच्या नावे वारस म्हणून मंजूर करण्यात आलेली आहे.\nतरी उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ यांच्या आदेशानुसार मयत इनामदार किशन गणपतराव कटकर यांचे वारस म्हणून बालासाहेब किशन कटकर यांचे नाव मौजे कौठळी येथील गट क्रमांक 175 च्या अधिकार अभिलेखात इत्तर हक्कात विरासतदार म्हणुन वारस नोंद करण्यासठी विरासत वारस नोंद घेतली ती मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "शंकर शिवराया महाजन"
}
