{
  "village_code": "272700110348570000",
  "village_name": "अंबाजोगाई (रुरल)",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 43951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-30",
  "objection_until": "2026-08-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:38Z",
  "surveys": [
    "253/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/07/2026\nमा.तहसीलदार साहेब अंबाजोगाई यांचे पत्र क्र 2023/जमा-1/कावी दि 04/10/2023 अन्वये श्री अनिरुद अनंतराव चौसाळकर रा चौसाळकर कॉलनी अंबाजोगाई यांनी सादर केलेल्या अर्जात सर्वे नंबर 253/2/1 क्षेत्र 3 एकर 18 गुंठे हे क्षेत्रफळ सन 1968-67 यावर्षी परिसर अभियांत्रिकी विभाग बीड यांनी संपादित करून रीतसर खरेदीखत करून संबंधित मालकास मोबदला देण्यात आला. त्या जागेवर सुधारित अंबाजोगाई पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी, पंप हाऊस, जॅकवेल, कर्मचारी निवासस्थान इत्यादी बांधकाम करून योजना चालू करण्यात आली. पुढे ही योजना नगरपरिषद अंबाजोगाई यांना हस्तांतरित करण्यात आली. पण 7/12 उताऱ्यावर नगरपरिषद किंवा महाराष्ट्र शासन यांच्या मालकी हक्काची नोंद करण्याचे दुर्लक्ष करण्यात आले. सदरील जमीन नगर परिषदेचे ताब्यात आहे मात्र ७/१२ उताऱ्यावर नोंद नाही. सदरील जमीन मोजून घेण्यासाठी अडचण येत आहे. असे नमुद केले आहे त्या अनुषंगाने अभिलेखाची पडताळणी करुन शासन परिपत्रक अधिसुचना/ शासन निर्णय मधील तरतुदी प्रमाणे नियमोचित कार्यवाही करणेबाबत कळविण्यात आले आहे त्यानुसार नगर परिषद अंबाजोगाई यांचे नावे सर्वे नंबर 253/2/1 मध्ये क्षेत्र 3 एकर 18 गुंठे क्षेत्राची नोंद घेतली पुढील कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "संतोष गोवर्धन चव्हाण"
}
