{
  "village_code": "272900010358860000",
  "village_name": "कुक्कडगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:11:13Z",
  "gone_at": "2026-11-03T22:53:31Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार शाम कृष्णाजी कुलकर्णी रा. कुक्कडगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, क. स्तर परंडा यांचे न्यायालयातील रे.दि.मु.नं. 270/2017 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे कुक्कडगाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 1 मधील मयत यमुना कृष्णाजी कुलकर्णी, मयत प्रकाश कृष्णाजी कुलकर्णी, वादी शाम कृष्णाजी कुलकर्णी, प्रतिवादी नं. 1 रामचंद्र कृष्णाजी कुलकर्णी, प्रतिवादी नं. 2 सिमा रमेश टिल्लू व प्रतिवादी नं. 3 शोभा सुनिल कुलकर्णी यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी शाम कृष्णाजी कुलकर्णी यांना\nगट नं. 1 मधील 0 हे 85 आर\n2) प्रतिवादी नं. 1 रामचंद्र कृष्णाजी कुलकर्णी यांना\nगट नं. 1 मधील 0 हे 84 आर\nजमीन गट नं. 1 मधील वादी शाम कुलकर्णी यांच्या हिश्यात एक पाण्याची बोअरवेल व इ.मोटार वादी शाम कुलकर्णी यांच्या स्वतंत्र मालकीची राहील. तसेच गट नं. 1 मधील विहिरीमध्ये वादी शाम कुलकर्णी व प्रतिवादी नं. 1 रामचंद्र कुलकर्णी यांचा वडिलार्जित ½ (अर्धा) हिस्सा असून यापुढे वादी शाम कुलकर्णी व प्रतिवादी नं. 1 रामचंद्र कुलकर्णी यांचा समान हिस्सा राहील.\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 14/12/2029 Exh. 18 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "आशुतोष गजानन देशमुख"
}
