{
  "village_code": "272900020359870000",
  "village_name": "पाथ्रुड",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:49:15Z",
  "surveys": [
    "1133",
    "1134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार - श्रीमती दीक्षा आनंद कणसे रा.करमाळा यांनी अर्ज करून विनंती केली आहे की , त्यांनी मौजे पाथरुड मधील गट न 1133 व 1134 मध्ये त्यांनी दस्त क्रमांक 1997 नुसार किसनाबाई विश्वनाथ कराळे यांच्याकडून क्षेत्र खरेदी केले आहे. त्यामधील दस्तात नमूद प्रमाणे सदर गटाच्या इतर अधिकार मध्ये वारसाचे हक्क कायम अशी फेरफार क्रमांक 510 नुसार नोंद दिसून येत आहे . मौजे पाथरुड मधील फेरफार क्रमांक 510 पाहिला असता असे दिसून येते की , फुलाबाई दगडू साळुंके या मयत झाल्यावर कोंडाबाई नाना कळसे , किसनाबाई विश्वनाथ कराळे , कलावती रामा कराळे असे एकूण 03 वारस व एकुक म्हणून कोंडाबाई नाना कळसे यांच्या नावे नोंद झालेली दिसून येत आहे . परंतु त्याच वेळी 7/12 वर वरील तीनही वारसांचे नावे नोंद मालकी हक्कात व कोंडाबाई नाना कळसे एकुक या नावाला कंस झालेला फेरफार क्रमांक 510 ने दिसून येत आहे . ज्या अर्थी एकुक नोंद कमी होऊन फेरफार क्रमांक 510 नुसार सर्व वारसांचे नावे मालकी हक्कात आल्याने इतर अधिकार मधील 510 ने इतर वारसाचे हक्क कायम ही नोंद पण कमी होणे अपेक्षित होते . फेरफार क्रमांक 510 मधील सर्व वारसांचे नावे मालकी हक्कात असल्याने 510 ने इतर वारसाचे हक्क कायम ही इतर अधिकार नोंद कमी करणे योग्य असताना पण सदर पोकळ नोंद कमी केलेली दिसून येत नाही . तसेच वारसा मधील कोंडाबाई नाना कळासे यांनी आपल्या हक्कामधील संपूर्ण हिस्सा विक्री केलेला आहे . त्यामुळे आज रोजी 7/12 वर त्यांचे नाव दिसून येत नाही . त्यामुळे सर्व वारस यांची नावे मालकी हक्कात यापूर्वीच आलेली असल्याने इतर अधिकार मधील नोंद जुने अभिलेखे , दस्त व अर्ज यानुसार कमी करण्यात आली . नोंद पुढील योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सविनय सादर .",
  "talathi": "संकेत ईश्वर काळे"
}
