{
  "village_code": "272900080366030000",
  "village_name": "बेळंब",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2727,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:58:25Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nन्यायालयातील तडजोडपत्राआधारे पोटगी रक्कमेचा व नुकसान भरपाई रक्कमेचा बोजा कमी करणेसाठी नोंद :-\nसंदर्भ क्र. 1) मा. जिल्हा न्यायाधीश-1 भोकर यांचेकडील PWDVA अपील क्र. 05/2025 उमेश व इतर विरुद्ध अन्नपूर्णा मधील निशाणी क्र. 1 आणि 13 नुसार सामायिक आदेश दि. 09/06/2026 ची छायांकित प्रत.\nसंदर्भ क्र. 2) सन्माननीय न्यायाधीश साहेब, जिल्हा व सत्र न्यायालय भोकर यांचे न्यायालयातील म. सं. कौ. हिं. का. अपील क्र. 05/2025 उमेश विरुद्ध अन्नपूर्णा तडजोडपत्र निशाणी क्र. 13 दि. 09/06/2026 ची छायांकित प्रत\nअर्जदार मारुती अर्जुन लोखंडे यांनी अर्ज व अर्जासोबत संदर्भीय आदेश व तडजोडपत्र सादर करून अर्जदारांचे बाजूस दर्शित सर्व्हे नं. मधील क्षेत्रावर नोंदविण्यात आलेली माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय उमरी या न्यायालयाने म. सं. कौ. हिं. का. अर्ज क्र. 14/2024 मध्ये दिनांक 25/03/2025 रोजी पारीत केलेल्या आदेशानुसार दरमहा पोटगी म्हणुन रुपये 6000/- व नुकसान भरपाई म्हणुन 500000/- रुपये ही नोंद कमी करणेसाठी विनंती केली आहे.\nप्रकरणात, अर्जदारांचा मुलगा उमेश मारुती लोखंडे व अन्नपूर्णा उमेश लोखंडे (लग्नापूर्वीचे नाव अन्नपूर्णा योगीराज भोकरे) यांचे विवाह संबंध जुळत नसल्यामुळे दिनांक 22/12/2025 रोजी उमेश व अन्नपूर्णा यांचा विवाह माननिय दिवाणी न्यायालय वरिष्ट स्तर भोकर येथील HMP No. 60/2025 या कारवाई नुसार माननिय न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशानुसार संपुष्टात आलेला आहे.\nसंदर्भ क्र. 2 मधील तडजोडपत्रातील मुद्दा क्र. 2 अन्वये, ज्याअर्थी उमेश व अन्नपूर्णा यांचे विवाह संबंध संपुष्टात आले असल्याने व दोघे पती पत्नी म्हणून राहिलेले नसल्यामुळे माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय उमरी या न्यायालयाने म. सं. कौ. हिं. का. अर्ज क्र. 14/2024 मध्ये दिनांक 25/03/2025 रोजी पारीत केलेल्या आदेशानुसार अन्नपूर्णा हिला दरमहा पोटगी म्हणुन रुपये 6000/-, संयुक्तीपणे नुकसान भरपाई म्हणुन अन्नपूर्णा हिला 500000/- रुपये, तसेच उमेश यांचे वडील मारोती अर्जुन लोखंडे यांच्या नावे मौजे बेळंब ता. उमरगा जि. उस्मानाबाद (धाराशिव) येथील शेत गट क्र. 77 मधील शेतजमीन कोणासही विक्री, हस्तांतरीत करु नये व सदर शेतजमीनीतील इतर अधिकारात अन्नपूर्णा हिच्या पोटगी व नुकसान भरपाई रक्कमेची नोंद माननिय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय, उमरी यांच्या आदेशानुसार केलेली नोंद ही उमेश व अन्नपूर्णा यांचे विवाह संबंध संपुष्टात आलेले असल्यामुळे सदरील 7/12 उताऱ्यावरुन कमी केल्यास अन्नपूर्णा यांचा कोणताही आक्षेप राहणार नाही. तसेच सदर तडजोडपत्रानुसार सदरची शेत गट क्र. 77 मधील इतर अधिकारात 7/12 उताऱ्यावर असलेली नोंद कमी करण्यात यावी हे अन्नपूर्णा यांना ह्या तडजोडी अंती मान्य व कबुल आहे.\nसंदर्भ क्र. 2 मधील तडजोडपत्रातील मुद्दा क्र. 2, 3, 4, 5 नुसार माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय उमरी या न्यायालयाने म. सं. कौ. हिं. का. अर्ज क्र. 14/2024 मध्ये दिनांक 25/03/2025 रोजी पारीत केलेल्या आदेशानुसार अन्नपूर्णा हिला दरमहा पोटगी म्हणुन रुपये 6000/- व नुकसान भरपाई म्हणुन 500000/- रुपये चा बोजा ची मौजे बेळंब ता. उमरगा जि. उस्मानाबाद (धाराशिव) येथील शेत गट क्र. 77 मधील इतर अधिकारात 7/12 उताऱ्यावर असलेली नोंद कमी करण्यासाठी अन्नपूर्णा यांना कुठलीही हरकत राहणार नाही हे त्यांना मान्य व कबुल आहे.\nतसेच संदर्भ क्र. 1 मधील सामायिक आदेशातील मुद्दा क्र 4 अन्वये बाजूस दर्शित सर्व्हे नं. मधील शेतावर आकारण्यात आलेला पोटगी व नुकसान भरपाई बोजा रद्द करण्यात येत असून याबाबत मौजे बेळंब येथील महसूल प्राधिकरणाने नोंद घ्यावी असे मा. न्यायालयाने निर्देशित केलेले आहे.\nतरी अर्जदारांचा अर्ज व सादर केलेले न्यायालयातील सामायिक आदेश व तडजोडपत्रानुसार बाजूस दर्शित सर्व्हे नं. मधील इतर अधिकारात अर्जदारांचे नावे नोंदविण्यात आलेली पोटगी व नुकसान भरपाई रक्कमेची नोंद कमी करणेसाठी नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "सुदेश दुर्गेश होनकळस"
}
