{
  "village_code": "273100040379970000",
  "village_name": "सासवड",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेश व दस्तऐवज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:32:05Z",
  "surveys": [
    "1649/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार- आदेश व दस्तऐवज\nअधिकारी-उपविभागीय अधिकारी सातारा\nआदेश-क्र;पुनर्व/महू-हातगेघर/कावी 15/2026 दि.29/09/2026\nआदेश-\nकुडाळी प्रकल्पाखालील जावली तहसिल मधील मौजे दापवडी, ता. जावली, जि. सातारा या पूर्णतः बाधीत गावातील प्रकल्पग्रस्त श्री. लक्ष्मण रामचंद्र गोळे यांची जमीन महू धरणासाठी संपादन झालेली आहे. सदर प्रकल्पग्रस्तास जमीन वाटप आदेश क्र 50 दि 10/5/2010 अन्वये सासवड ता. फलटण येथील जमीन वाटप करणेत आली असून महाराष्ट्र शासन निर्णय क्र. आरपीए/२०२१/प्र.क्र.१२९/२-१ दि. १४/१०/२०२१ तसेच शासन निर्णय क्र. आरपीए-२०२२/प्र.क्र.८२/र-१ दि.१४/०६/२०२२ नुसार त्यांचे संकलन दुरुस्त करणेत आल्याने ते वाढीव ०.४० हे.आर जमीन मिळणेस पात्र होत आहेत.\nअर्जदार लक्ष्मण रामचंद्र गोळे यांनी दापवडी गावच्या नियोजनानुसार मौजे सासवड ता. फलटण येथील पूर्वी वाटप केलेल्या गट नं.१६४९/२ मधील ०.४० हे. आर वाटपासाठी उपलब्ध असलेली जमीन मागणी केलेली आहे, महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तीचे पूनर्वसन अधिनियम, १९९९ चे कलम १६(१) प्रमाणे व मा. जिल्हाधिकारी सो, सातारा यांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सोबतचे प्रपत्र- अ मधील प्रकल्पग्रस्त खातेदार यांना मौजे सासवड ता. फलटण येथील सोबतच्या प्रपत्रातील रकाना क्र. १० च्या गट नं. मधील जमीन नमूद केलेल्या अटी व शर्तीना आधीन राहून मंजूर करण्यात येत आहे, आदेशा सोबतचे प्रपत्र- अ मध्ये रकाना क्र.१० मध्ये नमूद केलेल्या गट नं.चे ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात पुनर्वसन अंतर्गत देय क्षेत्र नवीन अविभाज्य शर्तीने व मधील कब्जे हक्काची रक्कम वसूल करणेवर असा शेरा नमूद करण्यात आला, व त्याप्रमाणे ७/१२ उताऱ्यास अंमल देण्याचा आदेश देण्यात येत आले आहेत.आदेश पाहून नोंद केली.",
  "talathi": "निलेश शिवाजी कणसे"
}
