{
  "village_code": "273100050381790000",
  "village_name": "गोंदवले खुर्द",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:37:49Z",
  "surveys": [
    "1045",
    "1109",
    "1128",
    "1154",
    "434/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nग्रामपंचायत हद्दीतील मौजे गोंदवले खुर्द येथील खालीलप्रमाणे गट नंबरमधील खातेदार श्रीमती बनुबाई श्रीराम पोळ (रा. गोंदवले खुर्द) या दिनांक 19/09/2024 रोजी मयत झाल्या आहेत.\n​त्यांनी हयात असताना दिनांक ०६/१०/२०२० रोजी नॉटरी नोंदणी क्र.३४६/२०२० अन्वये आपले स्वखुशीने व अक्कलहुशारीने मृत्युपत्र निष्पादित करून ठेवलेले आहे. सदर मृत्युपत्रानुसार त्यांनी त्यांच्या मालकीचा व अधिकाराचा खालील नमूद गट क्रमांकांमधील कायदेशीर चतुर्थांश (१/४) हिस्सा त्यांचे नातू १) श्री. प्रसाद जगन्नाथ पोळ व २) श्री. अमोल जगन्नाथ पोळ (दोघे रा. गोंदवले खुर्द) यांच्या नावे मृत्युपत्राद्वारे दिला आहे.\n​मिळकतीचा तपशील गट क्र:​ ११०९ ,११२८,११५४,४३४/१ ,१०४५\n​त्याअर्थी, मयत बनुबाई श्रीराम पोळ यांच्या मृत्यू दाखल्यावरून व दिनांक ०६/१०/२०२० च्या मृत्युपत्रानुसार, वरील सर्व गट क्रमांकांमधील मयत बनुबाई श्रीराम पोळ यांचे नाव कमी करून, त्यांचे हक्काचे हिस्से व क्षेत्र मृत्युपत्रधारक नातू १) श्री. प्रसाद जगन्नाथ पोळ व २) श्री. अमोल जगन्नाथ पोळ यांच्या नावे प्रत्येकी समान/कायदेशीर हिश्शाने फेरफार नोंद करण्यात येत आहे. कागदपत्र मृत्युपत्र अर्ज आर टीएस फाईलीस दाखल असे",
  "talathi": "पौर्णिमा प्रतापराव कडू"
}
