{
  "village_code": "273100110394270000",
  "village_name": "गोटेवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1463,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:24:52Z",
  "surveys": [
    "130",
    "135",
    "474",
    "480",
    "484",
    "548",
    "592",
    "606",
    "610",
    "624",
    "642",
    "688"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 251\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारीसो कराड उपविभाग कराड यांचेकडील आदेश क्र.आरटीएस /कावि-२५१/२०२६, दिनांक १४/१०/२०२६ च्या आदेशानुसार मौजे गोटेवाडी, ता. कराड येथील खातेदार कै. शामराव हरी तुळसणकर यांचे दिनांक २६/०६/२०२५ रोजी निधन झालेले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांची नोंद घेण्याबाबत अर्ज प्राप्त झाल्यानुसार फेरफार क्रमांक १४१० अन्वये वारस नोंद घेण्यात आली होती. तथापि, सदर फेरफार नोंदीमध्ये वारसाच्या नावामध्ये चूक झाल्याचे निदर्शनास आले होते. कै. शामराव हरी तुळसणकर यांचे वारस म्हणून शंकर शामराव तुळसणकर यांचे नाव नमूद होणे अपेक्षित असताना शंकर विठ्ठल तुळसणकर असे चुकीचे नाव नमूद झालेले होते.\nसदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी, कराड उपविभाग, कराड यांनी आदेश क्रमांक आरटीएस/कावि-२५१/२०२६, दिनांक १४/१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २५७ मधील तरतुदीनुसार फेरफार क्रमांक १४१० पुनर्विलोकनात घेऊन रद्द करण्याचा आदेश प्राप्त झाला आहे.सदरील आदेशानुसार फेरफार क्रमांक १४१० मधील चुकीची नोंद रद्द करण्यात येत आहे. तरी सदर आदेशान्वये वरील नोंद करण्यात आली आहे .सबब आदेश व इतर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्निल दादासोा नांगरे"
}
