{
  "village_code": "273200050402100000",
  "village_name": "अडुर",
  "taluka_name": "गुहागर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2511,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:51:46Z",
  "surveys": [
    "57/11",
    "57/12",
    "57/13",
    "59/17",
    "59/18",
    "59/19",
    "59/20",
    "68/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमहाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम 1947 चे कलम 27 अन्वये वितरित केलेल्या जमिनीची भूधारणा ही नियंत्रित सत्ता प्रकारची आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 29 अन्वये सिलिंग कायद्यांतर्गत वाटप जमिनीचा भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 व उपभूधारणा महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी अशी असणे आवश्यक आहे. मौजे अडूर येथील फेरफार क्र. ५५८९ दि. ०६/०१/१९७९ या फेरफारातील गट क्र. ५७/११, ५७/१२, ५७/१३, ५९/१७, ५९/१८, ५९/१९, ५९/२०, ६८/२३ भूमापन क्रमांकांचा उपभूधारणा प्रकार मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी असा चुकीने नोंदविलेला आहे. सदर भूमापन क्रमांकाच्या 7/12 पत्रकात उपभूधारणा प्रकार महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी असा असणे आवश्यक असल्याने शासन सूचनेनुसार व म.ज.म.अ.1966 मधील तरतुदीनुसार वरील जमीन मिळकतीचा उपभूधारणा प्रकार मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी ऐवजी उपभूधारणा प्रकार महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी असा करणेबाबत नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "निलेश नाना पाटील"
}
