{
  "village_code": "273200060404640000",
  "village_name": "शिवारआंबेरे",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3274,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:53:33Z",
  "surveys": [
    "158/23/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक /आरटीएस /155 /दुरुस्ती आदेश/ 132 /2026\nआदेश दिनांक : 18/07/2026\nमौजे शिवारआंबरे येथील सर्व्हे नंबर १५८ हि.नं. २३ एकूण क्षेत्र ०.६२.०० हे.आर आकार १७ या मिळकतीपैकी ०.०५.०० हे.आर इतके क्षेत्र पावस गावडेआंबरे, डोर्ले या रस्त्याचे कामी संपादन केलेले असल्यामुळे ते क्षेत्र वगळून उर्वरित म्हणजेच ०.५७.०० हे.आर क्षेत्र दस्त क्रमांक ६९७/दिनांक १३/०४/१९९८ चे खरेदीखताने खरेदी केल्याप्रमाणे फेरफार क्रमांक 1671 ने अर्जदार श्री. काशिनाथ केशव खानविलकर यांचे नाव ०.५७.०० हे.आर क्षेत्राला दाखल होऊन रस्त्याखालील संपादन केलेले क्षेत्र ०.०५.०० हे.आर क्षेत्र मूळ मालक श्री. महादेव नारायण शेलार यांचे नावे दाखल झाले. असे असताना भूसंपादन प्रकरण क्र. एल.ए.क्यू./एसआर/४१ नुसार प्रत्यक्षात ०.१२.७० हे.आर एवढे क्षेत्र संपादित करणेत आलेमुळे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग रत्नागिरी यांचे नावे फेरफार नोंद क्रमांक 2559 ने मूळ ७/१२ मधून ०.१२.७० क्षेत्र वेगळे करुन त्याचा नविन ७/१२ स.नं. १५८ हि.नं. २३ ब असा करणेत आला व मूळ ७/१२ फेरफार क्रमांक 2559 प्रमाणे स.नं. १५८ हि.नं. २३ अ लागवडी योग्य क्षेत्र ०.२३.३० पो. खराबा क्षेत्र ०.२६.० एकूण क्षेत्र ०.४९.३० आकार ०.13 या प्रमाणे नविन ७/१२ तयार करताना त्यामधून मूळ मालक श्री. महादेव नारायण शेलार यांचे नाव व त्याखालील क्षेत्र ०.75.० इतके कमी होणे गरजेचे होते. तसेच सदर ७/१२ ला ०.४९.३० या संपूर्ण क्षेत्रासाठी अर्जदार यांचे एकट्याचे नाव दाखल होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात सदर ७/१२ वर कब्जेदार सदरी महादेव नारायण शेलार वगैरे ०.०५ व श्री. काशिनाथ केशव खानविलकर क्षेत्र ०.४४.३० अशी चुकीची नोंद झालेली दिसून येत आहे.\nअर्जदार श्री. काशिनाथ केशव खानविलकर यांनी कलम १५५ नुसार दुरुस्ती होणेबाबत मा. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रत्नागिरी यांचेकडे दिनांक २९/०६/२०१८ रोजी अर्ज केलेला होता. त्याबाबत अर्जदार यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील खरेदीखत क्र. ६९७ दिनांक १३/०४/९८ प्रमाणे सदर क्षेत्र खरेदी केलेले असल्यामुळे महादेव नारायण शेलार यांचे सदरचे ७/१२ वरील नाव पुर्णपणे काढणे आवश्यक आहे असे नमूद करुन या कार्यालयात दिनांक १४/०८/२०१८ चे पत्राने कळविले आहे.\nतरी कब्जेदार सदरी दाखल असलेली श्री. महादेव नारायण शेलार वगैरे १२ यांची नावे कमी करुन क्षेत्राची दुरुस्ती होणेकामी व अर्जदार यांचे एकट्याचे नाव ०.४९.३० हे.आर या संपूर्ण क्षेत्राला दाखल होणेसाठी म.ज.म.अ. १९६६ चे कलम १५५ अन्वये दुरुस्ती होणे आवश्यक असल्याबाबत मा. तहसिलदार साो रत्नागिरी यांचे न्यायालयात आदेश क्रमांक /आरटीएस /155 /दुरुस्ती आदेश/ 132 /2026 तहसीलदार कार्यालय, रत्नागिरी दिनांक 18/07/2026 चालून मा. तहसिलदार साो रत्नागिरी यांनी खालीलप्रमाणे आदेश दिला\nआदेश\n१. अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.\n२. मौजे शिवारआंबरे येथील सर्व्हे नंबर १५८ हि.नं. २३अ या मिळकतीमध्ये दाखल असलेले श्री. महादेव नारायण शेलार वगैरे १२ यांची नावे कमी करण्यात येवून श्री. काशिनाथ केशव खानविलकर यांचे नाव ०.४९.३० हे.आर या संपूर्ण क्षेत्राला दाखल करण्यात यावे.\n३. खर्चाबाबत आदेश नाही.",
  "talathi": "सरिता संजय देसाई"
}
