{
  "village_code": "273400020419350000",
  "village_name": "नावली",
  "taluka_name": "पन्हाळा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1472,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:58:34Z",
  "surveys": [
    "50/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी पन्हाळा,उपविभाग कोल्हापूर\nआदेश क्रमांक : गावठाण/वशि/259/2026\nआदेश दिनांक : 23/09/2026\nमा. उपविभागीय अधिकारी, पन्हाळा, उपविभाग कोल्हापूर यांनी जा.क्र. गावठाण/वशि/259/2026 दिनांक 23/09/2026 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार, मौजे नावली, ता. पन्हाळा येथील गायरान गट क्रमांक 50/ब/1 मधील भूखंड क्र.38 बाबत शर्तभंग नियमानुकूल करण्यासाठी विहित मुदतीत संबंधित खातेदारांकडून कोणताही अर्ज अथवा खुलासा प्राप्त झालेला नसल्याने सदर जमीन शासन जमा करण्याबाबत अंतिम आदेश देण्यात आलेला आहे.\nसदर आदेशातील निर्देशानुसार संबंधित मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी गट क्रमांक 50/ब/1 मधील भूखंड क्रमांक 38 चा प्रत्यक्ष ताबा शासकीय पंचनाम्यासह शासनाकडे घ्यावयाचा असून, सदर गटाच्या 7/12 उताऱ्यावरील विद्यमान खातेदारांची नावे कमी करून शासन जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत.\nत्याअनुषंगाने सदर शासकीय आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी दि.13/10/2026 रोजी शासकीय पंचनामा करून गट क्रमांक 50/ब/1 मधील भूखंड क्र.38 शासकीय ताब्यात घेणेत आला असून गट क्रमांक 50/ब/1 मधील भूखंड क्र.38 च्या सातबारा सदरी मूळ भूखंडधारक कृष्णा पांडूरंग पाटील यांचे मयत वारस व विद्यमान खातेदार इंदुबाई कृष्णात पाटील,भैरवनाथ कृष्णात पाटील यांची नावे कमी करून शासनाचे नाव दाखल करण्याबाबत ही फेरफार नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "सुनिता बाळासाहेब गोरे"
}
