{
  "village_code": "273500090436500000",
  "village_name": "उटगी",
  "taluka_name": "जत",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16088,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:02:06Z",
  "surveys": [
    "67/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : मा. अपर तहसीलदारसो संख\nआदेश क्रमांक : क्र. हनो/वाटप/एसआर - 82/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nज्याअर्थी 1) हणमंतराय शिवाप्पा बिराजदार 2) महादेव शिवाप्पा बिराजदार 3) महांतेश मल्लेशाप्पा बिराजदार 4) शांतव्वा महादेव बिराजदार 5) सुभद्रा मल्लेशाप्पा बिराजदार 6) सविता शिवयोगेप्या सालुटगी 7) काशिबाई चंद्रशा तेली ४) लक्ष्मी परसुराम कतनळी सर्व रा. उटगी ता. जत जि. सांगली यांनी मौजे उटगी येथील जमिनीचे दिनांक 28/07/2026 अन्वये त्यांची मालकी यहीवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने बाटप करून घेतली असुन केले वाटपास कोणाची तक्रार अगर हरकल नाही. त्यामुळे केले वाटपास मंजुरी मिळणेची विनंती केलेली आहे.\nयाबाबत सर्व संबंधितांना नमुन अ नियम 3 ची नोटीस रुजू केली आहे. व नमुन व नियम 3 प्रमाणे उध्दघोषणा प्रसिध्द केली आहे. संबधीताचे जाबजबाब घेतले असून सदर वाटणीपत्राबाबत कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. महसुली / दिवाणी अथवा अन्य कोणत्याही कोर्टात संपुर्ण मिळकतीवर दावा चालू नसलेचे सांगीतले आहे. वाटपचा तपशील खालील प्रमाणे...\nवाटपापूर्वीचे क्षेत्र :-\nगावाचे नाव:- उटगी गट नं. 67/1 - क्षेत्र 4.45 (हे.आर.)पो.ख. 0.00(हे.आर.) 4.12\nवाटपाने पडलेले हिस्से/क्षेत्र :-\nगट नं. 67/1 हणमंतराय शिवाप्पा बिराजदार क्षेत्र 1.65 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 1.52 (पश्चिम बाजू)\nगट नं. 67/1 शांतव्वा महादेव बिराजदार क्षेत्र 1.40 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 1.30 (मधली पट्टी)\nगट नं. 67/1 महांतेश मल्लेशाप्पा बिराजदार क्षेत्र 1.40 (हे.आर.)पो.ख. 0.00 (हे.आर.) आकार 1.30 (पूर्व बाजू)\n1. जमीनीबाबत महसुली / दिवाणी अथवा अन्य कोणत्याही न्यायालयात दावा किंवा खटला सुरू नाही. तसेच भुसंपादन प्रस्तावही सुरू नाही. तसे आढळल्यास सदर मिळकत पुर्वपदी ठेवणेत येईल.\n2. इतर हक्कातील शेरे कायम ठेवणेचे आहेत. ग.नं. / स.नं. विभाजन करणेचे नाहीत.\n3. सदर आदेशाप्रमाणे पोटहिस्सा मोजणी करुन चलन इकडे जमा करावे.\n* महादेव शिवाप्पा बिरजादार, सुभद्रा मल्लेशाप्पा बिराजदार, सविता शिवयोगेप्पा सालुटगी, काशिबाई चंद्रशा तेली व लक्ष्मी परसुराम कतनळी यांनी सदर वाटणीपत्रास संमती दिलेने वाटपपत्र कले 7/12 मधुन त्यांचे नाव कमी करणेत यावे.\n* स.नं. 67/1 चे दक्षिण बाजुस पुर्व पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता हणमंत शिवाप्पा बिराजदार, शांतव्वा महादेव बिराजदार व महांतेश मल्लेशाप्पा बिराजदार यांना जाणे येणेसाठी समाईकात रस्ता ठेवला आहे.\nत्याअर्थी वरील केले वाटपास कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. तसेच केले वाटपामुळे मुंबईचा तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याचा भंग होत नाही. सबब मी अपर तहसिलदार संख मला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये प्राप्त झाले अधिकारानुसार वरील वाटपास मंजुरी देणेत येत आहे. वरीलप्रमाणे आदेशानुसार वाटप केले. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "MALAKU SOMANING MALI"
}
