Ferfar #190 · वेहगी
अक्क्लकुवा, नंदुरबार · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा.तहसिलदार सो. यांचे कडील आदेश क्रमांक/ई चावडी /कावि-243/2022, तहसिल कार्यालय अक्कलकुवा दिनांक-1/6/2022 तसेच मा. जमाबंदी आयुक्त, जमीबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांचेकडील दि.29/12/2018 रोजीच्या पत्रान्वये इतर हककातील महिला वारसांची नावे भोगवटदार सदरी घेणे बाबत सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या असुन दि.21/01/2022 रोजीच्या आयुक्त कार्यालयाच्या पत्रान्वये ई चावडी प्रकल्पाचे अंमलबजाबणी अज्ञावली विकसित करण्यात येत असुन त्याची पुर्व तयारी क्षेत्रीय स्तरावर 1 ते 14 मुददयी पुर्तता करणे बाबत सुचना निर्गमीत केल्या असुन मुददा क्रमांक 13 मध्ये गांव नमुना नंबर 7/12 मधील इतर हक्कातील रकान्यातील इतर महिला वारसांची नांवे कब्जेदार सदरी घेण्याची कार्यवाही विहीत पदधतीने करणे कळविले आहे.
तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 तारीख: 30 एप्रिल,2025 तसेच शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र. संप्रिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1, दिनांक 19.03.2025 जिवंत 7/12 मोहीम-टप्पा-2, 7/12 उतारा अद्दयावत करण्याबाबत त्यानुसार मौजे वेहगी गावातील गट 15,63,64/1 या गट क्रमांकावरील इतर हक्कातील महिलांची नावे कब्जेदार सदरी घेण्यात आली असे.