सातबारा Watch

← गुलीउंबर

Ferfar #745 · गुलीउंबर

अक्क्लकुवा, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
75/3
Talathi
प्रभाकर सानोप पाडवी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्र. संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 आदेश दिनांक : 19/03/2025 मा.जमाबंदी आयुक्त, जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे, यांचेकडील दिनांक 29/12/2018 रोजीच्या पत्रान्वये इतर हक्कातील महिला वारसांची नावे भोगवटदार सदरी घेणे बाबत सुचना निर्गमित करण्यात आल्या असुन दि. 21/01/2022 रोजीच्या आयुक्त कार्यालयाच्या पत्रान्वये ई चावडी प्रकल्पाचे अंमलबजावणी आज्ञावली विकसित करण्यात येत असुन त्याची पूर्व तयारी क्षेत्रीय स्तरावर 1 ते 14 मुद्यांची पूर्तता करणे बाबत सुचना निर्गमित केल्या असुन मुद्दा क्रमांक 13 मध्ये गाव नमुना नंबर 7/12 मधील इतर हक्क रकान्यातील महिला वारसांची नावे कब्जेदार सदरी घेण्याची कार्यवाही विहित पद्धतीने करणे कळविले आहे. तसेच जिवंत सातबारा मोहीम टप्पा 2 सातबारा उतारा अद्ययावत करण्याबाबत शासन निर्णय, महसुल व वन विभाग, क्र. संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1, दि.19/03/2025 मधील मुद्दा क्र.11 महिला वारस नोंदीबाबत हिंदू वारस कायदा, १९५६ अनुसार वडिलार्जित मिळकतीमध्ये वडीलांचे निधनानंतर मुलींना समान हक्क प्राप्त होतात, त्यामुळे वारस नोंदी घेताना महिला वारसांची नांवे इतर अधिकार सदरी न घेता भोगवटादाराचे नांव सदरी येणे अवश्यक व योग्य आहे. अशा सर्व वारस नोंदीमधील इतर अधिकार सदरी असलेली महिला वारसांची नांवे भोगवटादार सदरी घेणे बाबत शासन निर्णय निर्गमित झाल्याने त्यानुसार या गावातील बाजुस दर्शविलेल्या गट क्रमांकावरील इतर हक्कातील महिला वारसांची नावे कब्जेदार सदरी घेण्यात आली असे.