Ferfar #1147 · टवळाई
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- मंगलदास शिवदास राऊत
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
सक्षम अधिकारी : अपर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील
आदेश क्रमांक : क्र./टेनन्सी/फ/कक्ष-7/कावि-1226/भो-1 व विक्री/एसआर-66/2026 जिल्हाधिकारी कार्यालय, नंदूरबार
आदेशाचा दिनांक : 30/10/2026
श्री माणिक उर्फ कर्नर बलसिंग नाईक रा. मिशन बंगल्याजवळ, पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे यांनी उपोद्घातातील अ.क्र.5 चे अर्जान्वये, त्यांचे नावावरील मौजे टवळाई ता. शहादा जि. नंदुरबार येथील गट क्रं. 151 क्षेत्र 6 हे 59 आर आकार रु.12-25 पैसे ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने भोगवटादार वर्ग-2 या धारणाधिकारावर धारण केलेली शेतजमिन भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकाराची करुन दुस-या अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस श्री गणेश मुरलीधर पवार रा. खरगोन पो. रायखेड ता. शहादा जि. नंदुरबार यांना विक्री परवानगी मिळणेबाबत अर्ज केलेला आहे.
अर्जदार यांच्या विनंती अर्जास अनुसरुन तहसिलदार, शहादा यांचा चौकशी अहवाल मागविणेत आला होता. त्यांनी वरील अ.क्र.6 अन्वये सविस्तर अहवाल सादर केला असून त्यामध्ये प्रस्तुत शेतजमिन भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकाराची करुन विक्री परवानगी देण्याची शिफारस केलेली आहे.
प्रस्तूत शेतजमिन ही भोगवटदार वर्ग-2 या धारणाधिकारावर धारण केलेली असल्यामुळे अधिमुल्याची रक्कम वसूल करणेकामी सहजिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नंदुरबार यांचेकडील पत्र जा.क्र. कक्ष-6/मुल्यांकन/906/2026 दि.31-07-2026 अन्वये मुल्यांकन प्राप्त करून घेणेत आले आहे. विषयाधिन शेतजमिनीचे मुल्यांकन रू. 32,95,000/- (अक्षरी रु. बत्तीस लक्ष पंच्याणोव हजार मात्र) कळविलेले आहे. तसेच खरेदी-विक्री व्यवहार कामी सौदापावतीची रक्कम रु.4,20,000/- (अक्षरी रु.चार लक्ष वीस हजार मात्र) एवढी निश्चित केलेली आहे. मात्र सौदापावतीच्या रकमेपेक्षा मुल्यांकनाची रक्कम अधिक असल्याने त्यारकमेच्या 25% अधिमुल्याची रक्कम रू. 8,23,800/- (अक्षरी रु. आठ लक्ष तेवीस हजार आठशे मात्र) ही तात्पुरती अनर्जित उत्पन्नाची रक्कम अर्जदाराकडून दि.17-10-2026 रोजी तहसिलदार, शहादा यांनी शासकिय खजिन्यात भरणा करून घेतलेली आहे. तहसिलदार, शहादा यांनी त्यांचेकडील पत्र दि.21-10-2026 चे अर्जान्वये डीफेस चलन इकडेस सादर केलेले आहे.
सबब मी, अपर जिल्हाधिकारी नंदुरबार उक्त अ.क्र. 1 ते 4 अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार श्री माणिक उर्फ कर्नर बलसिंग नाईक रा. मिशन बंगल्याजवळ, पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे यांचे नावावरील मौजे टवळाई ता. शहादा जि. नंदुरबार येथील गट क्रं. 151 क्षेत्र 6 हे 59 आर आकार रु.12-25 पैसे ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने भोगवटादार वर्ग-2 या धारणाधिकारावर धारण केलेली शेतजमिन भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकाराची करुन दुस-या अनुसूचित जमातीच्या व्यक्ती श्री गणेश मुरलीधर पवार रा. खरगोन पो. रायखेड ता. शहादा जि. नंदुरबार यांना विक्री करण्यास खालील अटी शर्तीवर परवानगी देत आहे.
अटी/शर्ती
1. संबंधित तलाठी यांनी या आदेशान्वये प्रस्तूत शेतजमिन भोगवटादारवर्ग-1 (जुनीशर्त) करणेबाबत फेरफार नोंदवावा. तद्नंतर खरेदी-विक्री व्यवहाराची नोंद करावी.
2. श्री माणिक उर्फ कर्नर बलसिंग नाईक रा. मिशन बंगल्याजवळ, पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे यांनी सदरची शेतजमिन श्री गणेश मुरलीधर पवार रा. खरगोन पो. रायखेड ता. शहादा जि. नंदुरबार यांनाच विक्री करणे बंधनकारक आहे.
3. प्रस्तूत शेतजमिन खरेदी करणार यांना सदर शेतजमिनीचे जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचे पूर्वपरवानगीशिवाय विक्री अथवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करता येणार नाही व अशी परवानगी देणे किंवा नाकारणे हे जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे अधिकारात राहिल.
4. खरेदी केलेल्या क्षेत्राच्या मूल्यांकनाबाबत भविष्यात काही शासकीय वसूली निघाल्यास ती जमीन खरेदी करणार यांना भरणे बंधनकारक राहील.
5. जिल्हा पुनर्वसन अधिकारी, नंदुरबार यांचेकडील पत्र क्रमांक/पुनर्वसन/कावि-64/2026 दि.21-01-2026 नुसार शासन निर्णय दि.11 फेब्रुवारी 2022 च्या अनुषंगाने सदर जमिनीचे हस्तांतरणानंतर पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीनुसार भुसंपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी नवीन भु-धारकाची राहिल. सदरची बाब ही खरेदीखतात नमुद करण्यात यावी.
6. सदरची परवानगी विविध प्रचलित कायद्यातील तरतुदी व त्याखालील नियमांचे अधिन राहील. (उदा. मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948, महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा कमी करणे) अधिनियम 1961, इ.)
7. जमीनीची किंमत खरेदी-विक्री व्यवहार नोंदणी दिनांकास निश्चित होणारे शिघ्र सिद्ध गणकानुसार निर्धारित राहील. प्रस्तूत प्रकरणी सौदापावतीच्या रकमेपेक्षा मुल्यांकनाची रक्कम रू. 32,95,000/- (अक्षरी रु. बत्तीस लक्ष पंच्याण्णो हजार मात्र) ही रक्कम या पैकी जी जास्त असेल ती रक्कम जमीन विक्रेता यांना जमीन खरेदीदार यांनी द्यावी. सदर रक्कम जमीन विक्री करणार यांचे बँक खात्यात वर्ग झाल्याची तहसिलदार, शहादा यांनी खात्री करावी.
8. विषयांकित गट वनजमीन आढळल्यास वनजमीन कायद्यातील सर्व तरतूदी त्यास लागू राहतील.
9. उक्त जमीनीच्या मालकी हक्का बाबत अथवा क्षेत्रफळाबाबत भविष्यात वाद निर्माण झाल्यास अथवा कोणतीही न्यायालयीन बाब उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्याची संपुर्ण जबाबदारी अर्जदार व जमिन घेणार यांची राहील व त्यात तथ्य आढळल्यास तसेच स्थळ पाहणीत सदर आदेशापूर्वीच हस्तांतरण झाल्याचे निदर्शनास आल्यास परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.
10. प्रस्तूत प्रकरणी अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे, नमूद माहिती, स्वाक्षऱ्या/अंगठे ही वस्तुस्थितीशी विसंगत, माहिती दडविणारी, असत्य, चुकीची किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास सदरचा आदेश तात्काळ रद्द करण्यात येईल. याबाबतची संपूर्ण जबाबदारी अर्जदार व जमिन खरेदी करणार यांचीच राहील. अशा परिस्थितीत संबंधित फौजदारी कारवाईस पात्र राहतील.
11. प्रस्तूत शेतजमीन खरेदीनंतर शेतजमीनीस इतर अधिकारात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36, 36 अ च्या तरतुदी लागू राहतील. त्यामुळे गा.न.न.7/12 च्या इतर हक्कातील सदरचा शेरा कायम राहील.
12. सदर जमिनीचे भोगवटदार वर्ग-2 धारणाधिकावरुन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतर करण्यात येत असले तरी वेळोवेळी पारीत होणारे शासन निर्णय अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील.
13. खरेदी विक्री व्यवहार या आदेशाच्या तारखेपासून चार महिन्याच्या आत नोंदणीकृत करावा अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल याची नोंद घ्यावी.
14. वरीलपैकी कोणत्याही अटी शर्तीचा भंग झाल्यास जमिन सरकार जमा करण्यास पात्र राहिल.
मा.अपर जिल्हाधिकारी सो.नंदुरबार यांचेकडील वरील आदेश व सोबत मा. तहसीलदार सो.शहादा यांचेकडील पत्र क्रमांक/कु.का./कावि/582/2026 अन्वये गाव नमुना 7/12 वर नोंद केली असे.