सातबारा Watch

← मंदाणे

Ferfar #4609 · मंदाणे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
Certified
—
Gat / Survey
68/2/क, 68/2/ड
Talathi
धिरज वसंत अहिरराव
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 तहसिलदार शहादा यांच्याकडील आदेश क्रमांक/कु.का./477/कावि/ /2025 दिनांक 19.12.2025 (प्राप्त दिनांक 09.10.2026) अन्वये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 43 मध्ये कुळ हक्काने मिळालेल्या जमिनी विक्री करण्यापुर्वी जिल्हाधिकारी यांची पुर्वी परवानगी घेण्याची असलेली तरतुद सन 2014 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 1 अन्वये सुधारीत करण्यात आली आहे. या सुधारणे नुसार ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांका पासून 10 वर्षाचा काळ लोटला असेल, ती देणगी देण्याकरिता, तिची अदलाबदल करण्याकरिता गहाण ठेवण्याकरिता ती पट्टयाने देण्याकरिता किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरिता काही अटी व शर्तीवर जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीची अट शिथिल करण्यात आली आहे. शासन परिपत्रक क्रमांक-टीएनसी-04/2013/प्र.क्र.116/ज-1 दिनांक 07 मे 2014 मधील तरतुदीनुसार करण्यात आलेल्या सुधारणेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होण्याकरिता दि. 16.07.2014 रोजीच्या परिपत्रकानुसार विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेनुसार या मोहिमेत श्री. वेडू शामराव साळुंखे व सौ. वंदना साळुंखे रा. मंदाणा ता. शहादा जि. नंदुरबार यांनी त्यांचे नावे असलेली मौजे मंदाणे ता. शहादा जि. नंदुरबार येथील 68/2/क क्षेत्र 0.82 हे आर. आकार 1.80 रु. पैसे, गट नंबर 68/2/ड क्षेत्र 0.73 हे आर, आकार 1.80 रु. पै शेतजमीन असून सदर शेतजमीनी वरील कलम 43 नुसार नियंत्रीत सत्ता प्रकार हा शेरा कमी करण्याकरिता अर्ज केलाआहे. प्रस्तावातील फेरफार नोंद क्रं. 1208 नुसार कुळ कायदा कलम 3 A प्रमाणे एलजी धाकु हे कुळ नंतर फेरफार नोंद क्र. 1992 दि. 05/12/1961 नुसार, कुळ कायदा कलम 32ग प्रमाणे चौकशी होवून कुळास रक्कम रुपये 1375/- रक्कम ठरविणेत आली. तदनंतर फेरफार नोंद क्र. 2383 दिनांक 05/09/1968 नुसार एलजी धाकु पाट स.नं. 25 ची 32 ग नुसार ठरविलेली किंमत संपूर्ण भरुन दिल्याने इतर हक्कातून मुळ मालकाचे नावे केले आहे. तालुका हुकूम नंबर ALT-2740/68 ता. 15-4-68 रोजी कु.का.क. 32 म चे प्रमाणपत्र पारित झालेले आहे. अर्ज नाकाराच्या 40 पट नजराणा रक्कम 150/- मात्र रक्कम ग्राम प्रणालीद्वारे दिनांक 19/12/2025 रोजी सरकार भरणा केलेला आहे. उक्त नमूद शासन परिपत्रकानुसार श्री. वेडू शामराव साळुंखे व सौ. वंदना वेडू साळुंखे रा. मंदाणा ता. शहादा जि. नंदुरबार यांचे नावे असलेली मौजे मंदाणे ता. शहादा जि. नंदुरबार येथील गट नंबर 68/2/क क्षेत्र 0.82 हे आर ,आकार 1.80 रु. पैसे, गट नंबर 68/2/ड क्षेत्र 0.73 हे आर, आकार 1.80 रु. पैसे या शेतजमीनीच्या इतर हक्कातील तर नियंत्रीत सत्ता प्रकार हा शेरा कमी करणे तसेच भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये करणेस तहसिलदार शहादा यांच्याकडील आदेश क्रमांक/कु.का./477/कावि/ /2025 दिनांक 19.12.2025 (प्राप्त दिनांक 09.10.2026) अन्वये आदेशित करण्यात आलेले आहे. सबब नोंद घेतली असे.