सातबारा Watch

← शहादा

Ferfar #10523 · शहादा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
209/210/2/1/ब/4
Talathi
योगेश विश्वासराव देसले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्रमांक-2026/गांवठाण/कावि-417/2026 आदेश दिनांक : 13/10/2026 म. उपविभागीय अधिकारी सो.शहादा यांचेकडील आदेश क्रमांक-2026/गांवठाण/कावि-417/2026 उपविभागीय अधिकारी कार्यालय, शहादा भाग शहादा दि. 13/10/2026 अन्वये अनिलकुमार विरनन तेवर, विक्की अनिल तेवर, अमुदा अनिल तेवर व चंद्रु अनिल तेवर, सर्व रा. शहादा यांनी मौजे शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार येथील स.नं./ग.नं. 209/210/2/2/ब मधील प्लॉट नं. 4 एकूण क्षेत्र 299.00 चौ.मी. या क्षेत्राचा वापर रहिवास प्रयोजनावरून वाणिज्य प्रयोजनासाठी बदलण्यास मंजुरी मिळावी, याकरिता दिनांक 11/06/2026 रोजी अर्ज सादर केलेला आहे. मौजे शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार येथील स.नं./ग.नं. 209/210/2/1/ब ही जमीन उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांचेकडील बिनशेती आदेश क्र. 1986/एन.ए./एस. आर./19/86, दिनांक 15/10/1986 अन्वये रहिवास प्रयोजनासाठी बिनशेती वापराकरिता मंजूर करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी म.तहसीलदार सो. शहादा यांनी शिफारशीसह अहवाल सादर केलेला आहे. तसेच, नगर परिषद, शहादा यांचेकडील Building Permit No. 106036, दिनांक 21/10/2026 अन्वये वाणिज्य प्रयोजनासाठी बांधकाम परवानगी काही अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात आलेली आहे. वरील उक्त परिस्थिती विचारात घेता मौजे शहादा शिवारातील स.नं./ग.नं.209/210/2/1/ब मधील भु.क्र.4 एकूण क्षेत्र 299.00 चौ.मी या क्षेत्राचे रहिवास प्रयोजनाकडून वाणिज्य प्रयोजनार्थ वापरात बदल करण्यास खालील अटी शर्तीवर मंजूरी देण्यात येत आहे. अटी व शर्ती- 1. उपविभागीय अधिकारी, शहादा भाग, शहादा यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सदर भूखंडाचे विभाजन करता येणार नाही. 2. सदर परवानगी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 व त्याखालील लागू नियमांनुसार देण्यात येत आहे. 3. मौजे शहादा, ता. शहादा येथील स.नं./ग.नं. 209/210/2/1/ब या जमिनीच्या अभिन्यासास नगर रचनाकार, धुळे यांचेकडील पत्र क्र. 1783, दिनांक 28/11/1986 व पत्र क्र. 1514, दिनांक 15/08/1987 अन्वये मंजुरी मिळालेली आहे. सदर मंजूर अभिन्यासातील सर्व अटी व शर्ती अर्जदारांवर बंधनकारक राहतील. 4. सदर जमीन उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांचेकडील बिनशेती आदेश क्र. 1986/एन.ए./एस.आर./19/86, दिनांक 15/10/1986 अन्वये मंजूर करण्यात आलेली आहे. सदर मूळ मंजूरी आदेश व सनद यांमधील अटी व शर्ती कायम लागू राहतील व त्या अर्जदारांवर बंधनकारक असतील. 5. मुख्याधिकारी, नगर परिषद, शहादा यांचेकडील Building Permit No. 106036, दिनांक 21/10/2026 अन्वये वाणिज्य प्रयोजनासाठी मंजूर केलेल्या बांधकाम परवानगीतील सर्व अटी व शर्ती अर्जदारांवर बंधनकारक राहतील. सदर परवानगीतील अटीचे पालन करणे अर्जदारांना बंधनकारक राहील. 6. सदर भूखंडाच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्क सदरामध्ये नोंदविणे आवश्यक असलेल्या नोंदी प्रचलित नियमानुसार घेण्यात याव्यात. 7. अर्जदारांनी प्रस्तावासोबत सादर केलेली कागदपत्रे खोटी, बनावट अथवा वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे आढळून आल्यास किंवा या आदेशातील कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास, नियमानुसार सदर आदेश रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच, आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. 8. सदर प्रकरणाच्या अनुषंगाने कोणतीही शासकीय देय रक्कम, शुल्क अथवा अन्य आर्थिक दायित्व उद्भवल्यास.लागू नियमांनुसार ती ती रक्कम भरण्याची जबाबदारी अर्जदारांची राहील. 9. महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग 4, दिनांक 31 डिसेंबर 2025 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42(3) व कलम 47 मधील लागू तरतुदीनुसार, जमिनीच्या अकृषिक वापरासाठी देय असलेले एकरकमी अधिमूल्य विहित दराने व नियमानुसार भरणे अर्जदारास बंधनकारक राहील. सदर एकरकमी अधिमूल्याची रक्कम नियमानुसार संबंधित ग्राम महसुल अधिकारी यांचेकडे भरणा करावी. सदर रक्कम भरण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील. वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटीचा भंग झाल्यास, लागू कायदेशीर तरतुदींनुसार या परवानगीबाबत रद्दबातल करण्यासह योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. उपरोक्त आदेशान्वये गाव दप्तरी नोंद घेतली असे.