सातबारा Watch

← सारंगखेडा

Ferfar #5545 · सारंगखेडा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
478/2/2
Talathi
हेंमत पितांबर गोसावी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/07/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक आदेश क्रमांका/गावठाण/कावि-212/2026 दी 23/07/2026 दिनांक 23/07/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील स. नं. / गट नं. बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. सध्याचा स.नं. / गट नं. =478/2/2 बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 478/2/ब या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 155 अन्वय2. श्री मकसूद शेख गफार खाटीक रा. शहादा यांचा अर्ज प्राप्त दि.06/04/2026.3. मंडळ अधिकारी सारंगखेडा यांचा अहवाल जा.क्र/.मं.अ.सा. कावि-30 दि.29/04/26 प्राप्त दि.21/05/2026 आदेश क्रमांका/गावठाण/कावि-212/2026 दी 23/07/2026 मौजे सारंगखेडा ता. शहादा येथील बिनशेती स.नं. 478 मधील प्लॉट नं. 2ब मध्ये खरेदीखत व नोंदणीकृत दस्तानुसार कब्जेदार सदरी नाव दाखल होणेकामी संदर्भ क्र.02 अन्वये अर्जदार यांनी अर्ज सादर केला होता. त्यानुसार सविस्तर चौकशी करुन मंडळ अधिकारी सारंगखेडा यांनी संदर्भ क्र.03 अन्वये अहवाल सादर केलेला आहे.शहादा यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. 2966/2004 दि.19/08/2004 अन्यये श्री मकसूद शेख गफार खाटीक यांनी शेख अहवालानुसार मौजे सारंगखेडा येथील स.नं. 478 मधील प्लॉट नं. 2ब या मिळकतीचे दुय्यम निबंधक उस्मान शे. गुलाब मन्सुरी यांचेकडून खरेदीखत करुन विकत घेतलेले आहे. त्यानुसार फेरफार क्र. 1607 दि.19/11/2004 अन्वये मकसूद गफार खाटीक यांच्या नावे खाते केल्याची नोंद घेतलेली आहे. परंतु सातवारा संगणकीकरणात नजरचुकीने कब्जेदार सदरी दलियास शाह मोहम्मद शाह यांचे नाव लावण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने इलियास शाह मोहम्मद शाह यांनी सदर मिळकत त्यांच्या मालकीची नसल्याने त्यांचे नाव कमी करुन मकसूद खाटीक यांचे नाव लावण्यास काहीही तक्रार नसल्याचे दि.06/12/2023 रोजी कार्यकारी दंडाधिकारी शहादा यांचे समक्ष 100/- च्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र लिहून दिलेले आहे. मध्ये इलियास शाह मोहम्मद शाह यांचे नाव कमी करुन मकसूद गफार खाटिक यांचे नाव दाखल करणेस हरकत नसल्याचे त्यानुसार नोंदणीकृत दस्त क्र. 2966/2004 नुसार मौजे सांरगखेडा येथील स.नं. 478 मधील प्लॉट नं. 2ब स्पष्ट अभिप्राय मंडळ अधिकारी सारंगखेडा यांनी दिलेले आहे. मंडळ अधिकारी सारंगखेडा यांचेकडील अहवालाच्या आधारे मोजे सांरगखेडा येथील स.नं. 478 मधील प्लॉट नं. 2ब मध्ये नोंदणीकृत दस्त व फेरफार क्र. 1607 नुसार कब्जेदार सदरी इलियास मोहम्मद शाह यांचे नाव सबब कमी करून मकसूद गफार खाटीक यांचे नाव लावणेकामी म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये नियमानुसार उचित कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अद्ययावत सातबारासह ईकडेस सादर करावा. प्रति :- ग्रा.म.अ. सारंगखेडा / मंडळ अधिकारी सारंगखेडा ता. शहादा यांना पुढील कार्यवाहीसाठी. तहसिलदार शहादा प्रत :- श्री मकसूद शेख गफार खाटीक रा. शहादा ता. शहादा जि. नंदुरबार