Ferfar #4712 · रनाळे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 597/1
- Talathi
- झनक कचरु गायकवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र./ब/कक्ष.2/जमीन/मौजे-रनाळे/ग.नं.597-1/न.श.जु.रूपां./कावि/673/2026 दिनांक 01/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =597/1
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत विविध योजने अंतर्गत प्रदान/ अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी (भूमिहीन, शेतमजुर, स्वातंत्र्य सैनिक इ.) उप उपभूधारणा :नवीन शर्त
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
श्री. रोहिदास मंगा इंदवे रा. रनाळे ता. जि. नंदुरबार यांचे मालकीचे मौजे- रनाळे ता. जि. नंदुरबार येथील गट नंबर 597/1 क्षेत्र 2.00 हे. आर आकार 2.50 रु. पैसे ही नवीन शर्तीची धारण केलेली भोगवटादार वर्ग-2 ची शेतजमीन कृषिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करुन मिळणेस अर्जदार यांनी विनंती अर्ज सादर केला होता. त्यानुसार प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी व अवलोकन केले असता संदर्भ क्र.4 अन्वये तहसीलदार नंदुरबार यांनी भोगवटादार वर्ग-2 ची शेतजमीन कृषिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करणेबाबत अहवाल सादर केलेला आहे;
ज्याअर्थी, सह जिल्हा निबंधक, नंदुरबार यांनी त्यांचेकडील पत्र क्र./ कक्ष-6/मुल्यांकन/65/2026 दि.28.01.2026 रोजीच्या पत्रान्वये वरील नमुद नवीन शर्तीने धारण केलेली शेतजमीनीचा जिरायत दर र.रु.3,50,800/- प्र. हेक्टरी एवढे मुल्यांकन नमुद केले आहे. त्याप्रमाणे प्रस्तुत शेतजमीनीचे हंगामी बागायत दरानुसार शेतजमीनीचा दर र.रु. 5,26,200/-प्र.हे. एवढे येते. त्यानुसार मौजे- रनाळे ता. जि. नंदुरबार येथील गट नंबर 597/1 क्षेत्र 2.00 हे. आर आकार 2.50 रु. पैसे या शेतजमिनीचे हंगामी बागायत दरानुसार एकुण मुल्यांकन रक्कम रु. 10,52,500/- एवढे नमुद केले आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र. 1 च्या अधिसुचनेनुसार व संदर्भ क्र. 5 व 9 अन्वये अनर्जित उत्पन्नाची 25% रक्कम भरणेस मान्यता देण्यात आली होती;
अर्जदार यांनी अनर्जित उत्पन्नाची रक्कम म्हणून जमिनीच्या सन 2026-27 चे सुधारीत शिघ्रसिध्द गणकाप्रमाणे मुल्यांकन रक्कम रु. 10,52,500/- च्या 25% रक्कम रु.2,63,500/- मात्र (अक्षरी दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशें मात्र) दिनांक 03.09.2026 रोजी शासनास अदा केलेबाबत तहसीलदार नंदुरबार यांनी वाचले क्र.11 अन्वये डिफेस चलन क्र.GRN-MH009526508202627M सह अहवाल इकडेस सादर केला आहे.
त्याअर्थी, मला प्राप्त अधिकारान्वये मी, डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार या आदेशाव्दारे अर्जदार श्री. रोहिदास मंगा इंदवे रा. रनाळे ता. जि. नंदुरबार यांचे मालकीचे मौजे- रनाळे ता. जि. नंदुरबार येथील गट नंबर 597/1 क्षेत्र 2.00 हे. आर आकार 2.50 रु. पैसे ही नविन शर्तीने धारण केलेली शेतजमीन वाचले क्र.1 येथे नमुद महसूल व वन विभाग शासन अधिसुचना दि.04 मार्च 2025 अन्वये भोगवटादार वर्ग-2 धारणाधिकारावर प्रदान केलेल्या शेतजमिनीचे कार्यालयकृबिंदु अयासनासाठी भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करण्यास खालील नमूद अटी व शर्तीवर मंजूरी देण्यात आहे.
अटी व शर्ती :-
1) विषयांकित जमिन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरण झाल्यावर महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) कायदा 1961 मधील तरतुदींचा व तुकडेबंदी तुकडेजोड कायदा 1947 मधील तरतुदींचा भंग होणार नाही.
सदर जमिन पडीत न ठेवता कृषिक प्रयोजनासाठी वापर करावा.
2) खातेदाराने जमिनीचा उपयोग फक्त कृषिक प्रयोजनासाठीच करावा.
3) नागरी जमिन (कमाल मर्यादा धारणाविनियम) अधिनियम 1976 (महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे शेतजमिन कब्जेदार सदरी यांना बंधनकारक राहिल.
4) विषयांकित जमीनीच्या अधिमुल्यांबाबत अथवा आकारणी यात लेखापरीक्षण रकमेत तफावत आढळून आल्यास त्यानुसार येणारी फरकाची रक्कम जमीन मालक यांना भरणे बंधनकारक राहील. सदर रक्कम न भरल्यास जमीन महसूलाची थकबाकी म्हणून बोजाची नोंद अभिलेखात घेण्यात येईल. शासकीय वसुलीची रक्कम न भरल्यास
नियमानुसार वसुलीची कार्यवाही करण्यात येईल. यास अधिन राहून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरणास परवानगी
दिली आहे. 5) संबंधित तलाठी यांनी आदेशातील शेतजमीनीच्या गटाच्या 7/12 उताऱ्यावर भुधारणा पध्दती भोगवटदार वर्ग -1 मध्ये रुपांतरण अशी नोंद घेण्यात यावी.
6) अर्जदार यांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले कागदपत्र सत्य आहेत असे गृहीत धरून नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेली शेतजमीन भोगवटादार वर्ग-2 मधुन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करण्यास परवानगी कामी मंजूरी देण्यात येत आहे. भविष्यात यात कोणतेही असत्यता आढळल्यास किंवा मालकी हक्काबाबत विवाद निर्माण झाल्यास ती निराकरण करण्याची जबाबदारी अस्तित्वात असलेल्या जमीन मालक यांची राहील. 7)
सदर आदेश अर्जदाराने प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निर्गमित केलेले आहे, त्यामुळे विषयांकित प्रकरणी अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे, नमुद माहिती, स्वाक्षऱ्या/अंगठे ही बाब वस्तुस्थितीशी विसंगत, माहिती दडवणारी, असत्य, चुकीची किंवा दिशाभुल करणारी आढळल्यास सदरचा आदेश तात्काळ रद्द समजण्यात येईल. याबाबतची संपुर्ण जबाबदारी अर्जदार, जमीन धारक, कुलमुखत्यारपत्र धारक यांची राहिल.
8) सदर आदेशातील, प्रचलित शासन नियमांचा व कबुलायतीतील कोणत्याही अटी / शर्तीचा भंग झाल्यास जमीन सरकार जमा करण्यास पात्र राहिल.