Ferfar #929 · कंढरे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/5
- Talathi
- हरेष फकीर कोकणी
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन-1/लक्ष्मी मुक्ती/कावि-1766/2026
आदेश दिनांक : 05/10/2026
मा. तहसीलदार साहेब नंदुरबार यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन-1/लक्ष्मी मुक्ती/कावि-1766/2026 अन्वये
अर्जदार श्री. हिरामण राजधर पाटील रा. नंदुरबार ता.जि. नंदुरबार यांनी मौजे कंढरे ता.जि. नंदुरबार येथील ग.नं. 55/5 क्षेत्र 1.33 हे.आर.पो.ख.0.00 एकूण 1.33 हे. आर आकार 5.75 रु.पै. या शेतजमीनीच्या 7/12 च्या भोगवटदार सदरी त्यांची पत्नी नामे सौ. निकिता हिरामण बोरसे यांचे नाव सहधारक म्हणून दाखल करणे कामी आदेश होणे बाबत विनंती केली आहे.
त्यानुसार प्रस्तुत प्रकरण चौकशी कामी मंडळ अधिकारी, रनाळे यांचेकडेस पाठविण्यात आलेले असून मंडळ अधिकारी, रनाळे यांनी उक्त वाचले क्र.4 नुसार त्यांचा अहवाल इकडेस सादर केला. आणि ज्याअर्थी महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग परिपत्रक क्रमांक एस-14/2161816/प्र.क्र.458/ल-6 दि.15 सप्टेबर, 1992 नुसार " लक्ष्मी मुक्ती" योजनेंतर्गत एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या जमीनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा 7/12 च्या उताऱ्यात स्वतः बरोबर सह हिस्सेदार म्हणून नोंद घ्यावी, अशी स्वेच्छेने विनंती केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील कलमांच्या अधीन राहुन फेरफार नोंदी बाबतची सर्व प्रक्रीया पूर्ण करुन तशी नोंद घेण्यास हरकत नाही असे नमुद केले आहे.
त्याअर्थी वरील वाचले क्र. 1 व 4 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम, 1966 मधील कलमांच्या अधीन राहुन मौजे कंढरे येथील ग.नं. 55/5 क्षेत्र 1.33 हे.आर.पो.ख. 0.00 एकूण 1.33 हे. आर आकार 5.75 रु. पै. या शेतजमीनीचे 7/12 वर कब्जेदार श्री. हिरामण राजधर पाठील रा. कंढरे ता.जि. नंदुरबार यांच्या कायदेशीर पत्नी सौ. निकिता हिरामण बोरसे यांचे नाव सहधारक /सह हिस्सेदार म्हणून दाखल करणेसाठी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे.
अटी व शर्ती :-
1. वरील प्रमाणे आदेशाची अंमलबजावणी इतर हक्कातील शर्ती/ हक्क कायम ठेवून संबंधीतांना वर्दी नोटीसा बजावुन त्यांचा हरकती/निवेदन असल्यास त्यांवर योग्य ती कार्यवाही करुनच करावी.
2. तसेच सोसायटी अथवा बँकेचे बोजे असल्यास सोसायटी / बँकाचे संमती पत्र किंवा बोजे कमी करुनच फेरफार नोंदविण्यांत यांवा.
3. सदरचा आदेश अर्जदार यांनी दाखल केलेले दस्तऐवज, प्रतिज्ञापत्र व जबाबात त्यांनी केलेल्या विवेचनावरुन पारीत करण्यात आलेला आहे.
4. या बाबत कोणीही हितसंबंधी यांनी आरटीएस किंवा मा. न्यायालयात आव्हान केल्यास सदरचा आदेश / नोंद रह समजण्यास येईल व त्यास संबंधीत अर्जदार जबाबदार राहतील.
5. उक्त शेतजमीनीच्या भूधारणा पध्दतीमध्ये बदल करण्यात येऊ नये.
वरीलप्रमाणे आदेशानुसार नोंद घेतली असे.