Ferfar #1088 · वाल्हवे
साक्री, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- उर्मिला कोंडाजी साबळे
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
क्रमांक : क्रमांक/जमीन/वाटणी/एस.आर क्र./88/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 मधील तरतुदीनुसार मा. अपर तहसिलदार सो. पिंपळनेर यांचेकडील क्रमांक/जमीन/वाटणी/एस.आर क्र./88/2026 दि.13/10/2026 अन्वये मौजे वाल्हवे ता. साक्री येथील गट नं.179 क्षेत्र ला.यो.5 हे 49 आर पो.ख. 1 हे 02 आर आकार 3.20 रु.पै. चे खालिलप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे.
धारण जमिनीचा तपशिल
गट नं.179 - क्षेत्र 5.49 हे.आर. पो.ख. 1.02 हे.आर.आकार- 3.20 रु.पै. मुळ कब्जेदार नाव- परशराम भीका कोकणी ,सोनुबाई बंड्या कोकणी
नविन विभागणी केलेल्या जमिनीचा तपशिल
1) परशराम भीका कोकणी -गट नं.179 क्षेत्र 4.29 हे.आर.पो.ख. 1.02 हे.आर.आकार-2.00 रु.पै.दिशा – पश्चिमेकडील उत्तर दक्षिण भाग
2) सोनुबाई बंड्या कोकणी -गट नं.179 क्षेत्र 1.20 हे.आर.पो.ख.0.00 हे.आर.आकार-1.20 रु.पै.दिशा – पूर्वेकडील उत्तर दक्षिण भाग वर नमुद केले प्रमाणे विभागणी करणेस खालील शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे.
अटी व शर्ती
1) ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील सदर शेतजमीन असेल त्याच शर्तीवर व त्याच वर्गात विभाजनानंतर सदर जमीन राहील.
2) वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावा.
3) सदर शेतजमीनीतील पुर्वापार रस्त्याची व इतर वहिवाट कायम राहतील.
4) महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमीनीचे विभाजन) नियम 1967 अन्वये वाटणीस आलेल्या जमीनीवर इतर हक्कात जमीनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमीनी बरोबर संबंधीत जमीन धारकांवरच राहतील.
5) वरील शेतजमिनीचे मुंबई धारण जमीनीचे तूकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 अन्वये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे विभाजन करता कामा नये. जमीनीचे वहिवाट एकत्रीत व्हावयास पाहिजे.
6) प्रस्तावित विभाजनामुळे शासनाचे अल्प भुधारकांना देऊ केलेल्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही.
7) महाराष्ट्र जमीन (धारणेची कमाल मर्यादा) अधिनियमातील तरतुदींच्या अधिन राहून या विभाजनास परवानगी देण्यात आलेली आहे.
8) भूमीहीन व अल्पभुधारक या संज्ञेखाली जमीनीची मागणी करता येणार नाही.
9) सदरची परवानगी उपोद्दघातात नमूद अधिनियमान्वये देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त वापरात बदल अथवा इतर परवानगी आवश्यक असल्यास अर्जदार यांनी त्यांचे स्तरावरुन परवानगी घेऊन जमीन वहिवाट करावयाची आहे.
10) अर्जदाराने उपोदघातात नमूद अधिनियमाचा भंग केल्यास सदर आदेशान्वये देण्यात आलेली परवानगी आपोआप रद्द होईल.
11) सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरिक्षक भूमी अभिलेख साक्री यांचेकडून 1 महिण्याचे आंत रितसर मोजणी करुन घेणे संबंधीतांवर बंधनकारक राहिल.
12) इतर हक्कातील शेरे व बोजे कायम ठेवावेत.
13) सदर विभाजनाच्या परवानगी मुळे भविष्यात काही वाद उद्भवल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी संबंधीत खातेदरांवर राहिल.
14) पुन्हा सदर क्षेत्राचे हस्तांतरण करावयाचे असल्यास त्या बाबत परवानगी घेण्यात यावी. वरील प्रमाणे वाटप आदेश झालेने आदेशाप्रमाणे नोंद.
(मा. अपर तहसिलदार सो. पिंपळनेर यांचेकडील आदेशावरुन)