Ferfar #1058 · मैंदाणे
साक्री, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- किरण हिरामण वाघ
- First seen
- 45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन-2/कावि/160/2026
आदेश दिनांक : 06/08/2026
अर्जदार श्री. हिरामण वेडू जाधव रा. मैंदाणे ता. साक्री जि. धुळे यांनी मौजे मैंदाणे ता. साक्री जि. धुळे येथील ग.नं. 12 क्षेत्र 0 हे 60 आर पो.ख. 0 हे 00 आर आकार रु. 0.80 पै. या शेतजमीनीच्या 7/12 उता-यावर कब्जेदार सदरी हिरामण वेडू कोळी या नावाऐवजी हिरामण वेडू जाधव असे महाराष्ट्र शासन राजपत्रान्वये नावात दुरूस्ती करणे बाबत ईकडील कार्यालयास विनंती अर्ज सादर केला आहे. ज्याअर्थी ग्राम महसुल अधिकारी मैंदाणे यांचेकडून चौकशी करण्यात आली असून त्यांचेकडील चौकशी अहवाल व प्रस्तावात उपलब्ध कागदपत्रावरून पुढीलप्रमाणे वस्तुस्थिती आढळून येते. सदर गटाच्या 7/12 उता-यावर हिरामण वेडू कोळी असे नाव असून अर्जदार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्रान्वये हिरामण वेडू जाधव असे नाव दुरूस्ती होणे बाबत संदर्भिय पत्र क्र. 3 अन्वये अनूकूल अहवाल सादर केला आहे. व त्याबाबत अर्जदार यांनी ग्राम महसुल अधिकारी मैंदाणे यांचे समक्ष दिनांकीत स्वाक्षरीचा जबाब देखील नोंदविला असून सदर जबाब प्रकरणांत सामील केला आहे. ज्याअर्थी म. राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय (म. राज्य) पुणे यांचेकडील क्र. 79 दि.19/11/2018 रोजीच्या पत्रान्वये विहीत अटी शर्ती तसेच सदरील प्रक्रीयेमध्ये तहसिलदार यांनी राजपत्राने नावात बदल करण्यास मान्यता देवून आदेश निर्गमित केल्याशिवाय ई फेरफार प्रणालीतून ग्राम महसुल अधिकारीला फेरफार घेता येणार नाही अशी मार्गदर्शक सूचना नमूद आहे. त्याअर्थी उपरोक्त वर्णन केल्याप्रमाणे तसेच ग्राम महसुल अधिकारी, मैंदाणे यांनी सादर केलेल्या अहवालावरून व म. राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय (म. राज्य) पुणे यांचेकडील मार्गदर्शक सुचना क्र. 79 दि.19/11/2018 अन्वये मी अपर तहसिलदार पिंपळनेर मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये मौजे मैंदाणे ता. साक्री जि. धुळे येथील ग.नं. 12 क्षेत्र 0 हे 60 आर पो.ख. 0 हे 00 आर आकार रु. 0.80 पै. या मिळकतीवर प्रस्तावात सामील राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन राजपत्र जानेवारी 23, 1992/माघ 3, शके 1913 (के - 967) अन्वये हिरामध वेडू कोळी या नावाऐवजी हिरामध वेडू जाधव अशी नावात दुरूस्ती करणे बाबत ग्राम महसुल अधिकारी मैंदाणे यांना खालील प्रमाणे नमुद केलेल्या अर्टी व शर्तीसह नाव दुरुस्ती करणेबाबत आदेश केला आहे.
अ.क्र. गावाचे नाव स.नं. 7/12 वरील जूने नाव आदेशानूसार दुरूस्ती करावयाचे नाव
1 मैंदाणे 12 हिरामध वेडू कोळी हिरामण वेडू जाधव
1. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे अपुरी, चुकीची अथवा दिशाभुल करणारी किंवा बनावट असल्याचे सिध्द झाल्यास सदरचा आदेश आपोआप रदद समजण्यात यावा व त्याला अर्जदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.
2. सदर आदेशाबाबत भविष्यात काही न्यायालयीन दावा अथवा इतर वाद उदभवल्यास सदरचा आदेश रद्द समजण्यास पात्र राहिल व त्यास अर्जदार जबाबदार राहतील.
3. प्रस्तुत आदेशाबाबत कोणतीही हरकत असल्यास सदर आदेश रद्द समजण्यात यावा. याबाबत हितसंबधीत मंडळ अधिकारी व ग्राम महसुल अधिकारी यांनी नोंद प्रमाणित करण्यापुर्वी तशी खात्री करावी.
वरीलप्रमाणे ऑनलाईन 7/12 उतारा वेगळा न करता, खातेदार यांचे क्षेत्रात व इतर कोणताही बदल न करता, या आदेशान्वये ऑनलाईन फेरफार घेऊन तात्काळ नावात दुरूस्ती करण्यात यावी. व दुरूस्त उता-यासह अहवाल सादर करावा.
( अपर तहसिलदार पिंपळनेर यांच्या आदेशावरून )