Ferfar #988 · शेलबारी
साक्री, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- दिपक उत्तमराव बागुल
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/वाटणी/एस.आर.क्र.81/2026
अपर तहसील कार्यालय पिंपळनेर
आदेश दिनांक : 24/08/2026
खातेदार श्री. सुधाकर दौलतराव शिंदे वैगरे रा. नाशिक यांनी त्यांचे खातेवरील मौजे शेलबारी ता .साक्री जि.धुळे शिवारातील शेतजमीन गट नं 98 या खात्यावर असलेल्या शेतजमिनीची खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी केली असे .
अ.क्र गाव गट नंबर क्षेत्र हे.आर. पो.ख.हे.आर. आकार रु.पै. दिशा कब्जेदाराचे नाव
1) शेलबारी 98 0.59 0.03 0.30 पूर्व उत्तर लगत मध्य उषाबाई दौलत शिंदे
2) शेलबारी 98 0.59 0.03 0.30 पूर्व उत्तर क्षेत्र सुधाकर दौलत शिंदे
3)शेलबारी 98 0.59 0.03 0.30 पूर्व दक्षिण क्षेत्र प्रभावती भास्कर धुमणे
4) शेलबारी 98 0.58 0.04 0.30 पश्चिम दक्षिण लगत मध्य क्षेत्र संध्या विजय चौधरी
5) शेलबारी 98 0.58 0.04 0.30 पश्चिम दक्षिण क्षेत्र कल्पना प्रमोद फुलकर
6) शेलबारी 98 0.58 0.04 0.30 पूर्व दक्षिण लगत मध्य क्षेत्र राजेंद्र दौलत शिंदे
7) शेलबारी 98 0.58 0.04 0.30 पश्चिम उत्तर लगत मध्य तुषार दौलत शिंदे
8) शेलबारी 98 0.59 0.03 0.30 पश्चिम उत्तर क्षेत्र मिना विजय शिंदे, निनाद विजय शिंदे, विशाल विजय शिंदे
संबधी मुळ कब्जेदार व त्यांच्या वारसांनी पुर्णपणे संमती दिली आहे महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 कलम 85 अन्वये त्या खालील शर्ती व महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमि विभाजन नियम 1967) अन्वये असलेल्या अधिकारानुसार वर नमूद केले प्रमाणे विभागणी करणेस खालील शर्तीवर परवानगी देण्यांत आली असे.
अटी व शर्ती
1. ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील सदर शेतजमीन असेल त्याच शर्तीवर व त्याच वर्गात विभाजनानंतर सदर जमीन राहील.
2. वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावा.
3. सदर शेतजमीनीतील पुर्वापार रस्त्याची व इतर वहिवाट कायम राहतील.
4. महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमीनीचे विभाजन) नियम 1967 अन्वये वाटणीस आलेल्या जमीनीवर इतर हक्कांत जमीनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमीनी बरोबर संबंधित जमीन धारकांवरच राहतील.
5. वरील शेतजमीनीचे मुंबई धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 अन्वये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे विभाजन करता कामा नये. जमीनीचे वहिवाट एकत्रित व्हावयास पाहिजे.
6. प्रस्तावित विभाजमुळे शासनाचे अल्प भुधारकांना देऊ केलेल्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही.
7. महाराष्ट्र जमीन (धारणेची कमाल मर्यादा) अधिनियमातील तरतुदींच्या अधिन राहून या विभाजनास परवानगी देण्यात आलेली आहे.
8. भुमीहीन व अल्पभुधारक या संज्ञेखाली जमीनीची मागणी करता येणार नाही.
9. सदरची परवानगी उपोदृघातात नमूद अधिनियमान्वये देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त वापरात बदल अथवा इतर परवानगी आवश्यक असल्यास अर्जदार यांनी त्यांचे स्तरावरून परवानगी घेऊन जमीन वहिवाट करावयाची आहे.
10. अर्जदाराने उपोदघातात नमूद अधिनियमाचा भंग केल्यास सदर आदेशान्वये देण्यात आलेली परवानगी आपोआप रदद होईल.
11. सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका निरीक्षक भूमी अभिलेख साक्री यांचेकडून 1 महिण्याचे आत रितसर मोजणी करून घेणे संबंधितांवर बंधनकारक राहिल.
12. इतर हक्कांतील शेरे व बोजे कायम ठेवावेत.
13. सदर विभाजनाच्या परवानगी मुळे भविष्यात काही वाद उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबधित
खातेदारांवर राहिल.
14. पुन्हा सदर क्षेत्राचे हस्तांतरण करावयाचे असल्यास त्या बाबत परवानगी घेण्यांत यावी.
वरीलप्रमाणे वाटणी चे खाते .
(मा . अपर तहसिलदार सो पिंपळनेर यांचे आदेशावरून)