Ferfar #69994 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/2/अ/64
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.ब/कक्ष.1/बिनशेती/कावि/859/2026 दिनांक 13/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं./गट नं.19/2/अ/64
सध्याची भूधारणा पद्धती भूधारणा भोगवटादार वर्ग 2 उपभूधारणा वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्तान जमिनी वगळून) उप उपभूधारणा सरंजाम इनाम
बदल केलेली भूधारणा पद्धती भूधारणा भोगवटादार वर्ग 1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
म.जिल्हाधिकारी धुळे यांचे कडील आदेश क्र.ब/कक्ष.1/बिनशेती/कावि/859/2026 दिनांक 13/10/2026 अन्वये मौजे वलवाडी येथील सर्व्हे क्र.19/2/अ पैकी प्लॉट नंबर 64 चे क्षेत्र 150.00 चौ.मी.चे मालक गुलाब शंकर वाघ राहणार वलवाडी ता.जि.धुळे हि नवीन शर्तीची मिळकत भोगवटादार वर्ग.2 (नविन शर्तीची) ऐवजी भोगवटदार वर्ग.1(क- सत्ता ) मध्ये रुपांतरीत करण्याचा आदेशातील खालील अटी व शर्ती अनुसरुन
अटी व शर्ती
1)सदरचा आदेश हा महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 व महाराष्ट्र जमीन महसुल (भोगवटादार वर्ग.2 आणी भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमीनी भोगवटदार वर्ग.1 मध्ये रुपांतरीत करणे) नियम ,2019 च्या नियमास धरुन केलेला आहे.ते सर्व नियम प्रस्तुत मिळकतीस व तिचे धारक/सहधारक यांचेवर बंधनकारक राहतील.
2)प्रस्तुत मिळकतीच्या अकृषिक वापर बांधकाम परवानगी बाबत शासन निर्णय महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक/एनएपी/2025/प्र.क्र.177/जमीन/01 अ दिनांक 10/02/2026 च्या तरतुदी लागू राहतील
3)अर्जदार हे सदर मिळकत भोगवटदार वर्ग 1/क-सत्ता प्रकार या धारणा प्रकारावर धारण करतील
4)विषयांकित मिळकतीच्या अधिमुल्यांबाबत अथवा आकारणी बाबत लेखापरीक्षण करतांना रकमेत तफावत आढळून आल्यास त्यानुसार फरकाची रक्कम जमीन मालक यांना भरणे बंधनकारक राहिल सदर रक्कम न भरल्यास नियमानुसार जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसुल करण्यात येईल.
5)शासन निर्णय दिनांक 10/02/2026 व दिनांक 23/04/2026 नुसार अर्जदार यांनी अकृषिक वापराबाबत एकवेळचे अधिमुल्य (ONE TIME PRIMIUM)भरणे बंधनकारक राहील
6)अपर तहसिलदार धुळे/नगर भूमापन अधिकारी धुळे यांनी आदेशातील मिळकतीच्या मिळकत पत्रिकेवर भोगवटादार वर्ग.1(क सत्ता प्रकार) मध्ये रुपांतरीत व इतर अधिकारात .रहिवास प्रयोजनासाठी रुपांतरीत .अशी नोंद घेण्यात यावी.तसेच वापरात बदल करावयाचा असल्यास महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक एनएपी/2025/प्र.क्र.177/जमीन -01 अ दिनांक 10/02/2026 नुसार कार्यवाही करण्यात यावी
7)सदरची परवानगी अर्जदार यांचे अभिकथन व प्रकरणी दाखल कागदपत्रावरुन देण्यात येत आहे.तथापि भविष्यात विषयांकीत मिळकतीचे मालकी हक्काबाबत ,हद्दीबाबत वाद उदभवल्यास त्याचे निराकरण करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील तसेच प्रकरणी दाखल कोणत्याही कागदपत्रात असत्यता आढळून आल्यास सदरचे आदेश रद्द करणेत येतील.
7)वरीलपैकी कोणत्याही शर्तीचा भंग झाल्यास किंवा प्रस्तुत कामी अर्जदाराने पुरविलेली माहीती खोटी आढळुन आल्यास सदरचा आदेश रद्द करण्यात येईल (अर्ज,उपरोक्त आदेशा वरुन)