Ferfar #6101 · मंगरुळ
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/8
- Talathi
- आनंत कबीर माळी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
श्री. प्रशांत धर्मा पाटील रा.गरताड ता. चोपडा जि. जळगाव यांनी मौजे मंगरुळ ता. चोपडा येथील गट नं.74/8 चे क्षेत्र 1.02 हे.आर. पोख. 0.00 हे. आर एकुण क्षेत्र 1.02 हे. आर आकार 7.15 रु. पैसे ही महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 अन्वये अतिरिक्त घोषित केलेली शेतजमीन नवीन अविभाज्य शर्तीवर धारण केलेल्या शेतजमीनीस भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेकामी उपोद्घातातील अ. नं. 4 अन्वये तहसिलदार चोपडा यांचे कार्यालयास अर्ज सादर केला आहे.
तद्अनुषंगाने तहसिलदार चोपडा यांनी उपोद्घातातील अ. नं. 5 अन्वये मौजे मंगरुळ ता. चोपडा येथील गट नं.74/8 चे क्षेत्र 1.02 हे.आर. पोख. 0.00 हे. आर एकुण क्षेत्र 1.02 हे. आर आकार 7.15 रु. पैसे भोगवटादार वर्ग-2 मधुन वर्ग-1 मध्ये रुपांतरण करुन मिळणेकामी चौकशी करुन अहवाल सादर केला आहे. प्रश्नाकिंत जमीन मूळतः सिलींग कायद्यांतर्गत असून सदर शेतजमीन मुळ मालकास फेरफार नोंद नं.222 दि.17/02/1977 अन्वये प्राप्त झालेली असलेबाबत नमुद केलेले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-व- क्रमांक मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 4 मे, 2026 महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) (भोगवटादार वर्ग-2 चे भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करणे) नियम 2026 मधील 3 (ख) (2) (एक) नुसार उक्त अधिनियमाच्या कलम 27 अन्वये भोगवटादार वर्ग-2 धारणाधिकारावर वाटप केलेल्या व वाटपानंतर ज्या जमिनी जिल्हाधिकारी यांच्या पुर्वपरवानगीने हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत किंवा ज्या जमिनींच्या वापरात बदल करण्यात आलेला आहे, अशा महानगर प्रदेश, महानगरपालिका, किंवा नगर परिषद व त्यांनी सीमावर्ती क्षेत्र यामध्ये असलेल्या जमिनीव्यतिरीक्त इतर जमिनी भोगवटादार वर्ग-1 करणेकामी वार्षिक दर विवरणपत्राप्रमाणे परिगणना केलेल्या अशा जमिनीच्या मुल्याच्या पंचवीस टक्के नजराणा रक्कम भरणा करुन घेणेबाबत नमुद आहे.
तद्अनुषंगाने सह. दुय्यम निबंधक चोपडा यांच्याकडील शिघ्र सिध्दगणकानुसार प्रश्नांकित शेतजमिनीचे एकूण क्षेत्राचे बारमाही बागायत दराने मुल्यांकन रक्कम रुपये 5,05,512/- (अक्षरी रुपये पाच लाखपाच हजार पाचशे बारा मात्र) मात्रच्या 25% अनर्जित रक्कम रुपये 126378/- ग्रास चलनाव्दारे चलन क्र. MH008882706202627M दिनांक 24.08.2026 अन्वये भारतीय स्टेट बँक शाखा चोपडा येथे सरकार जमा केले आहे.
यास्तव मी, अपर जिल्हाधिकारी जळगांव, या आदेशान्वये, मौजे मौजे मंगरुळ ता. चोपडा येथील गट नं.74/8 चे क्षेत्र 1.02 हे.आर. पोख. 0.00 हे. आर एकुण क्षेत्र 1.02 हे. आर आकार 7.15 रु. पैसे या सिलींग कायद्यांतर्गत प्राप्त शेतजमीनीस "कृषिक प्रयोजनार्थ" भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतर करणेस खालील शर्तीवर मंजूरी देण्यात येत आहे:-
अटी व शर्ती :-
1. अर्जदार श्री. प्रशांत धर्मा पाटील रा.गरताड ता. चोपडा जि. जळगाव यांनी मौजे मंगरुळ ता. चोपडा येथील गट नं.74/8 चे क्षेत्र 1.02 हे.आर. पोख. 0.00 हे. आर एकुण क्षेत्र 1.02 हे. आर आकार 7.15 रु. पैसे ही शेतजमीन आदेशाच्या दिनाकांपासून भोगवटादार वर्ग-1 वर धारण करतील.
2. उक्त जमिन भविष्यात विक्री करण्यास सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
3. भविष्यात सदर जमिनीचा विक्रीचा व्यवहार करावयाचा झाल्यास खालील कायद्याच्या तरतुदींच्या अधीन
राहून करण्यात यावा.
अ) महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961.
ब) मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948
क) मुंबईचा तुकडे प्रतिबंधक व जमीन एकत्रिकरण कायदा, 1947.
ड) सदर जमिनीस लागू असलेल्या संबंधित इतर प्रचलित कायद्यातील तरतुदींप्रमाणे अधीन राहून करण्यात यावा.
4. भविष्यात हक्काभिलेखासंबंधात काही वाद उद्भवल्यांस त्या वादाची संपूर्ण जवाबदारी जमीन धारकावर राहील.
5. प्रस्तुत प्रकरणी शासन खजिन्यात भरणा करणेत आलेल्या नजराणा रकमेबाबत भविष्यात फरकाची रक्कम निघाल्यास, सदरची फरकाची रक्कम शासन खजिन्यात भरणा करणे जमीनधारक यांच्यावर बंधनकारक राहिल.
6. वरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास केल्यास अगर प्रस्तावातील कोणतीही माहिती/कागदपत्रे खोटी असल्याचे नंतर आढळून आल्यास सदरचा आदेश आपोआप रद्द होऊन कोणत्याही प्रकारची भरपाई न देता शेतजमीन शासन जमा केली जाईल.
म.जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, जळगाव. यांचेकडील आदेश क्र. कुळका/3/सिलींग/ईऑफीस क्र.3251251/एसआर/22/2026 म.जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, जळगाव यांचे कार्यालय, दिनांक:-11/09/2026 नुसार गावदप्तरी नोंद केली असे.