Ferfar #2194 · निमगव्हाण
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- तिलेश अशोक पवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग
आदेश क्रमांक :क्रमांक/जमीन/पो.ख./2026/E-368480
आदेश दिनांक : 05/10/2026
महाराष्ट्र शासनाकडील दिनांक 29/8/2018 रोजीचे अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल ( जमीनीच्या वापरावर निर्बंध) सुधारणा नियम, 2018 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (जमीनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 च्या नियम 2 चा पोट नियम (2) मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्याअन्वये धारकाने पोटखराब क्षेत्र लागवडी खाली आणल्यास त्या प्रकरणी लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात, पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे त्याकरीता अतिरिक्त आकारणी करण्यात येईल. अशी तरतुद करण्यात आली आहे.
म. तहसिलदार चोपडा यांचे कडील पत्र क्रमांक जमीन-2/कावि/E-9436046/2026 दिनांक 16/09/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल (जमीनीच्या वापरावर निबंध) नियम, 1968 अंतगत महाराष्ट्र जमीन महसूल (जमीनीच्यावापरावर निर्बंध सुधारणा नियम, 2018 अन्वये सुधारीत नियम 2 (2) नुसार मौजे निमगव्हाण ता. चोपडा जि.जळगांव परिशिष्ट- ब मधील नमुद केले नुसार पोटखराब वर्ग (अ) मधील क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे सदर क्षेत्राचा संबंधीत. गट नंबर 62 मधील लागवडी योग्य क्षेत्रामध्ये समावेश करुन अतिरिक्त आकारणी निश्चीत करण्याकरीता म.उपविभागीय अधिकारी सो अमळनेर यांच्या कार्यालयाकडेस अहवाल प्राप्त झालेला आहे. 1) सदर प्रकरणात मौजे निमगव्हाण, ता. चोपडा जि. जळगांव येथील परिशिष्ट मधील पोटखराब वर्ग (अ) जमीनलागवडीखाली आणल्याबाबत तलाठी निमगव्हाण ता. चोपडा यांचे समोर जमीन धारक व पंच यांनी जबाब नोंदविले आहेत. 2) मंडळ अधिकारी यांचा सदर लागवडी खाली आणलेले क्षेत्र लागवडी योग्य असल्याबाबत अहवालात नमूद आहे.3) उप अधिक्षक भूमी अभिलेख चोपडा यांचेकडील दिनांक 20/07/2026 रोजीचा अहवाल तसेच पोटखराब वर्ग अ क्षेत्र असले बाबत उल्लेख असलेल्या अभिलेखाची नक्कल प्रत व दुरुस्ती आकारणीचा तपशिल प्रपत्र- 1 प्राप्त झाला आहे. वरील अहवालच्या पडताळणीअंती मौजे निमगव्हाण, ता. चोपडा येथील प्रपत्र व यादी मधील पोटखराब वर्ग (अ) मधील हो जमीन धारकाने लागवडीखाली आणली असल्याचे निदर्शनास येते. सदर प्रकरणात जमीन धारकांचे जवाब व पंचनामा त्यासोबतची कागदपत्रे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे स्थळ पहाणी अहवाल व मूळ अभिलेख विचारात घेता उपोद्घातातील मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी म उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मोजे निमगव्हाण ता. चोपडा येथील पोटखराब वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्याच्या निष्कर्षाप्रत आलेली आहे. त्याजगी महाराष्ट्र जमीन महसूल जमीनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1966 व सुधारणा नियम, 2018 अन्द्रवसे सुधारीत नियम 2 (2) नुसार माना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर वरील प्रमाणे नमूद केलेल्या प्रपत्र व यादी मधील पोटखराब वर्ग (अ) या क्षेत्राला क्षेत्रात समावेश करून सदर क्षेत्राचे स.न गट नं.62 मधील सद्यस्थितील एकुण लागवडीखालील क्षेत्राच्या 2.10 हे आर आकारणी 8.000 च्या प्रमाणात प्रपत्र व मध्ये नमुद केल्या प्रमाणे अतिरिक्त आकारणी करण्यात मान्यता देत आहे.म. उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांच्या कडील आदेश क्रमांक :क्रमांक/जमीन/पो.ख./2026/E-368480 दिले वरून नोंद दप्तरी दाखल असे