Ferfar #57705 · चोपडा
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1585
- Talathi
- गणेश राजाराम महाजन
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
अर्जदार मिलींद बळवंत कंक यांनी त्यांच्या नांवे असलेला मौजे चोपडा, ता. चोपडा जि. जळगांव येथील ग.नं. 1585 चे क्षेत्र 1.34 हे. आर आकार 11.95 रु. पै. या शेतजमिनी वरिल नियंत्रित सत्ता प्रकार कु का क 43 प्रमाणे हा शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग । करणेबाबत विनंती अर्ज सादर केला आहे.
सदर शेतजमिनीची फेरफार नोंद क्र. 16049 दि.30/01/1962 अन्वये गंगाधर वामन कंक (कुळ) यांनी जमीन मालक बळवंत सदाशिव देशपांडे यांचेमार्फत सदर शेतजमीन खेरदीने घेतलेली असून सदर प्रकरणी मे. मामलेदार कडील नं.T.R.L.183/57 दि.13/11/1961 अन्वये परवानगी आहे. फेरफार नोंद क्र.16324 दि.02/02/1963 टे. अॅक्ट कलम 43 प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा शेतजमीन न्यायाधिकरण व मामलेदार चोपडा यांचेकडील टी. आर 294/57 दि.10/01/1963 अन्वये नोंद करणेत आलेली आहे. शासन परिपत्रक दि. 16.07.2016 नुसार कुळ हक्क मान्य होऊन खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासुन 10 वर्षाच्या काळ लोटला असुन आकाराच्या 40 पट येणारी नजराणा रक्कम आकारण्यात येऊ नये असे नमुद केलेले आहे.
तसेच फेरफार नोंद क्र. 11695 दि.23/04/1952 अन्वये मुंबई सरकारचा सन 1950 चा कुलकर्णी व परगणे वतन नष्ट करण्याचा कायदा आल्यानेसार कुलकर्णी, देशमुख व देशपांडे इनाम वर्ग 5 च्या जमीनी खालसा करणेत आलेल्या आहेत. फेरफार नोंद क्र. 13931 दि.10/12/1956 अन्वये मे. मामलेदार सो. चोपडा यांचेकडील WTN 1431/42-56 अन्वये आकाराचे सहा पट रक्कमेवर नवीन व अविभाज्य शर्तीवर आलेली आहे. फेरफार नोंद क्र.16026 दि.05/12/1961 बळवंत सदाशिव देशपांडे यांना प्रात अमळनेर यांचेकडील W.S. 5519 दि.03/07/1961 अन्वये जुने शर्तीने देणेत आली वरुन जुने शर्तीने नोंद करणेत आलेली आहे.
उपरोक्त विवेचनावरुन ,तहसीलदार चोपडा, ता. चोपडा जि. जळगांव अर्जदार यांचे नावे असलेला मौजे चोपडा, ता. चोपडा जि. जळगांव येथील ग.नं. 1585 चे क्षेत्र 1.34 हे. आर आकार 11.95 रु. पे. या गटावरील कुळ कायदा कलम 43 नुसार नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करण्याचे आदेश दिला आहे. या आदेशानुसार कुळकायदा कलम 43 नुसारचे निबंध उठविण्यात येत असुन त्यानुसार अधिकार अभिलेखात नोंदविलेले कूळ कायदा नि. स. प्र. कु का. कलम 43 प्रमाणे हि नोंद कमी करुन भोगवटादार वर्ग - 1 कडे रुपांतरीत करणेचे आदेश देत आहे. तसेच सदर शेतजमीनीचे इतर हक्कात जुनी शर्त असा शेरा दाखल करणेत यावा.
म तहसीलदार सो यांचेकडील क्र.कु.का./43/एस.आर/22/2026 दि. 19/10/2026 आदेश आलेवरून नोंद केली असे.