सातबारा Watch

← वनोली

Ferfar #1776 · वनोली

यावल, जळगाव · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
130/3
Talathi
दिलीप फकिरा केदारे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 मा. तहसिलदार सो यावल यांच्या कडील आदेश क्रमांक कुळका / कावि /03/2026 दि 23/10/2026 अन्वये अर्जदार पवन भागवत कोल्हे रा बामणोद ता यावल यांनी दिनांक 22/7/2026 रोजी अर्ज करून त्यात मोजे वनोलो ता यावल येथील गट नं 130/3 क्षेत्र हे 1.11 आर पो ख 0.04 एकुण 1.15 हे आर आकार रु 8.55 या जमिनीची भुधारणा भोगवटादार वर्ग 2 मधून । होणे (जुनी शर्त) होणेयाबत विनंती केलेली आहे. मोजे वनोली ता यावल येवोल गट नं 130/3 चा जुना सर्व्हे नं 66 चे सन 1950 पासूनचे गाव नमुना सातबारा व त्यावरील फेरफार नोंदी यांचे अवलोकन केले असता सदरची जमीन हि इनाम वर्ग 5 देशमुख इनाम असून फेरफार क्रमांक 954 नुसार सदरच्या जमिनीची कब्जा हक्काची रक्कम भरणा केलेने सदरची जमीन हि नवीन व अविभाज्य रिग्रॅट करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक/जमीन 2025/प्र क्र336/जमीन 1/ई 1379234 दिनांक 16/07/2026 नुसार कुळाने जमीन खरेदी करून 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असेल तर महसूल आकारणीच्या चाळीस पट एवढी रक्कम आकारणी करू नये अशा सूचना आहेत. प्रश्नाधीन मिळकत हि फेरफार क्रमांक 50 नुसार मूळ कुळ यांनी खरेदी करून 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. प्रश्नाधीन मिळकत हि अर्जदार यांनी शासन परिपत्रक महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक वतन -:4 दि-ल/223.क्र.प्र/101909 जुलै 2002 नुसार 50 टक्के नजराणा भरून भोगवटादार वर्ग 1 करून मिळणेबाबत विनंती केली आहे. दुय्यम निबंधक सावदा यांचे कडील दिनांक 13/9/2026 रोजीच्या मुल्यांकन पत्रान्वये नुल्यांकन रक्कम रु 650325 अक्षरी र रु सहा लाख पन्नास हजार तीनशे पंचवीस असले बाबत कळविले आहे. उपरोक् संदर्भीय अर्जाच्या अनुषगाने अर्जदार यांनी सदरच्या जमिनीच्या प्राप्त मुल्यांकनाच्या आधारे 50 टक्के रक्कम रु.325163/- अक्षरी (तीन लाख पंचवीस हजार एकशे त्रैहस्ष्ट रु मात्र) इतकी दिनांक 14/10/2026 रोजी प्रास प्रणालीवर GRN MH011820144202627 M या क्रमांकाने भरणा केलेली असलेने मौजे वनोली ता यावल येथील गट नं 130/3 क्षेत्र हे 1.11 आर पो ख 0.04 एकुण 1.15 हे आर आकार रु 8.55 पै या जमिनीची भूधारणा वर्ग । करणेबाबत पुढील अटी व शर्तीवर आदेशित करणेत येत आहे. 1) शेतजमिनीचे उपयोगात बदल करण्यापूर्वी सक्षम अधिकारी यांची परवानगी घ्यावी, 2) खरेदीदार हा शेतकरी असला पाहिजे, 3) भविष्यात हक्का अभिलेखा संबंधात काही याच उ‌द्भवल्यास त्या बागा संबंधीची संपूर्ण जबाबदारी जमीन धारकावर राहील. 4) . सदर विक्रीचा व्यवहार खालील कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून करण्यात यावा. > महाराष्ट्रशेत जमिन (जमीनधारणेचीकमालमर्यादा) अधिनियम 1961. > मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948. > मुंबई चा तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा 1947. सदर जमिनीस लागू असलेल्या संबंधीत इतर प्रचलित कायद्यातील तरतुदी लागू राहतील > 5) सदर शेतजमीन हस्तांतरण करणेपूर्वी गाव नमुना सातबारा चे इतर हककातील बोझे कमी करणे आवश्यक राहील 6) अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्र व मुल्यांकनाच्या आधारे 50% अनर्जित उत्पन्नाची रक्कम भरणा करण्यात आलेली असुन सदर मुल्यांकनाबाबत काही तफावत निघाल्यास ती भरणा करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील. 7) वरील पैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास / केल्यास अगर प्रस्तावातील कोणती हो माहिती खोटो असल्याचे नंतर आढळून आल्यास सदरचा आदेश आपो आप रद्द होऊन कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न देता जमीन सरकार जमा केली जाईल. असा गांवी आदेश आलेवरून नोंद केली असे