Ferfar #2776 · वढोदे प्र. सावदा
यावल, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 443/2
- Talathi
- श्वेता राजेद्र ससाणे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
मा. उपविभागीय अधिकारी सो यांचे कडील आदेश क्र कुळका/कावि/02/2026 दि. 15/10/2026 अन्वये श्री. नंदकिशोर श्रीधर चौधरी रा. पिंपरुड ता. यावल जि. जळगाव यांनी त्यांच्या मालकीची कुळ कायदा कलम ४३ या शर्तीवर धारण केलेल्या मौजे वढोदे प्र. सावदा ता. यावल येथील गट नं. ४४३/२ क्षेत्र हे. ०.९२ आर आकार रु. ७.०० पैसे, या शेतजमिनीचे इतर हक्कातील कुळ कायदा कलम ४३ चा शेरा कमी करणेकामी या कार्यालयास विनंती अर्ज सादर केलेला आहे.
अर्जदार यांचे मौजे वढोदे प्र. सावदा ता. यावल येथील गट नं. ४४३/२ क्षेत्र हे. ०.९२ आर आकार रु. ७.०० पैसे, शासन परिपत्रक दिनांक १६ जुलै २०२६ मधील तरतुदींनुसार अर्जदाराकडून कोणताही ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये अशी तरतूद असून, सदर प्रकरणात कुळाच्या खरेदीस/३२ एम होऊन १० वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेला असल्यामुळे, मा.उपविभागीय अधिकारी, फैजपूर भाग, फैजपूर मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन कायदा १९४८ चे कलम ४३ व त्या लगतचे नियम २५ अ १ (फ) (II) नूसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन उपरोक्त जमीनीचे ७/१२ चे इतर हक्कातील बोजे कायम ठेऊन, इतर हक्कातील कायदा कलम ४३ नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करुन, भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ करणेबाबत आदेशित करीत आहे. असा गावी आदेश आलेवरून नोंद केली असे.