सातबारा Watch

← मुंगसे

Ferfar #2442 · मुंगसे

अमळनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
153/2/अ
Talathi
प्रकाश बारकु महाजन
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक कुळकायदा/कावि/332/2026 दिनांक 18/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =153/2/अ सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मौजे मुंगसे ता. अमळनेर येथील गट क्र. 153/2/अ चे क्षेत्र हे.1.19 आर आकार रु.9.20 पै. ही शेतजमीन अर्जदार व इतर यांचे मालकीची असून नियंत्रित सत्ता प्रकार कुळकायदा कलम 43 प्रमाणे धारण केलेली आहे. अर्जदार यांनी उपोदघातातील अ.क्र. 3 अन्वये या कार्यालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. त्यानुषंगाने सदर मिळकतीच्या इतर हक्कातील नियंत्रित सत्ता प्रकार कुळकायदा कलम 43 प्रमाणे हा शेरा कमी करुन मिळण्याकामी विनंती केली आहे. उपोदघातातील अनुक्रमांक 1 वरील दिनांक 16/07/2014 रोजीच्या परिपत्रकात नमुद केलेप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना कलम 32 म चे प्रमाणपत्र दि. 1 जुलै 2014 पुर्वी मिळालेले आहे व मालक झालेल्या कुळांना 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे, याबाबत खातरजमा करुन अश्या मिळकतीच्या आकाराच्या 40 पट नजराण्याची रक्कम भरुन घेऊन इतर हक्कातील नियंत्रित सत्ता प्रकार कुळकायदा कलम 43 प्रमाणे हा शेरा कमी करण्याबाबत सूचित केलेले आहे. त्यानुसार प्रश्नाधिन मिळकतीसंबंधी गावचे दप्तरी झालेली फेरफार नोंद नं.958 दि. 20/06/1970 नुसार टेनन्सी खरेदीने सदरची मिळकत (कुळ) अर्जदाराचे नांवे प्राप्त झालेली आहे. उपोद्घातातील अनुक्रमांक 2 वरील दिनांक 16/07/2026 रोजीच्या परिपत्रकात नमुद केलेप्रमाणे यापुढे विहित 10 वर्षांचा कालावधी संपल्यावर सदर तरतुदींनुसार कार्यवाही करतांना महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारण्यात आलेला नाही. मौजे मुंगसे ता. अमळनेर येथील गट क्र. 153/2/अ चे क्षेत्र हे.1.19 आर आकार रु.9.20 पै. या शेतजमीनीच्या इतर हक्कात नमुद नियंत्रित सत्ता प्रकार कुळकायदा कलम 43 प्रमाणे हा शेरा कमी करुन भूधारणा पध्दतीत नमुद भोगवटादार वर्ग 2 हा शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग- 1 असा शेरा नोंदविण्याबाबत याद्वारे आदेश वरून नोंद केली असे.