Ferfar #4651 · पिंपळकोठे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/27
- Talathi
- प्रविण सुकदेव सोनवणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
वाचलेः-
1. श्री अर्जुन पदमा चव्हाण व इतर 5, रा. पिंपळकोठे, ता. पारोळा जि. जळगाव यांचा अर्ज तहसिलदार पारोळा मार्फत प्राप्त दि.01/09/2026 अहवाल
2. उप वनसंरक्षक जळगाव वन विभाग जळगाव यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.ब/सर्व्हे/प्र.क्र./1470/सन 2026-27, जळगाव दिनांक 27/07/2026
3. दुय्यम निबंधक श्रेणी-1, पारोळा यांचेकडील दि. 09/07/2026 चे मुल्यांकन सन 2026-27
4. सहायक संचालक, नगर रचना जळगांव यांचे कडील जा.क्र. झोन दाखला/ससंजळ/ई-ऑफीस /Online अर्ज क्र.540/जळगावं दि.07/07/2026
5. तहसिलदार पारोळा यांचेकडील पत्र क्रमांक जमीन-3/न.अ.श./एस आर/213/2026 दिनांक 12/10/2026 अन्वये अभिप्राय.
6. मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक याचेकडील पत्र क्र. मशा/कार्या.2/ज-1/44416/जा.क्र. 19992, दिनांक 29/09/2016.
7. महसूल व वन विभाग अधिसूचना क्र. जमीन-2016/प्र.क्र.82/ज-1, दि. 31/03/2016 व दिनांक 17/09/2016.
8. शासन महसूल व वन विभाग निर्णय क्र. जमीन-01/2014/प्र.क्र. 04/ज-1, दि.20/02/2016
9. महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे) असाधारण क्र.87 अधिसूचना दि.08/03/2019
10. सहसचिव, महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्र. जमीन/2081/प्र.क्र.90 भाग-1/ज-1 दि.10/12/2020.
11. सहसचिव, महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्र. जमीन /2081/प्र.क्र.90 भाग-1/ज-1 दि.27/01/2021.
12. कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्र. मुद्रांक-2021/प्र.क्र.110/म.-1 (घोरण) दि.31/03/2021.
13. महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे) असाधारण क्र. 101 अधिसूचना दि.27/03/2023.
14. महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 04/03/2025.
आदेश क्र. जमीन-4/33/19/नअश/प्र.क्र/168/3455834/2026 जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, जळगांव, दिनांक :- 24-10-2026
उपोद्घातातील अ.क्र. 1 अन्वये, अर्जदार श्री अर्जुन पदमा चव्हाण व इतर 5 रा. पिंपळकोठे, ता. पारोळा जि. जळगाव यांनी त्यांचे मालकीची मौजे पिंपळकोठे ता. पारोळा जि. जळगांव, येथील गट नं. 147/27, क्षेत्र 2.02 हे. आर आकार रु. 3.60 पैसे या नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनीस कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग -2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतर करणेकामी परवानगी मिळणेस विनंती केली आहे. उपवनसरंक्षक, जळगाव वनविभाग, जळगांव यांचेकडील उपोद्घातातील क्र.2 च्या पत्रानुसार प्रश्नाधिन जमिन ही वन जमिन दिसून येत नसल्याबाबत अभिप्राय दिलेले आहेत. तसेच प्रश्नाधिन जमिनीबाबत भूसंपादन प्रक्रिया चालु, पूर्ण वा प्रस्तावित नसलेबाबत दिसून येत आहेत.
मागील तीन वर्षाच्या गाव नमुना नं. 12 पिकपाहणी मध्ये कापूस पिकाचा पेरा असून अजलसिंचीत कॉलममध्ये पिकपाहणीचे क्षेत्र नमूद आहे. तसेच सदर जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर जलसिंचनाचे साधन विहीर दिसून येत आहे. सबब हंगामी बागायत मुल्यांकन घेण्यात आलेले आहे.
उपोद्घातातील क्र. 4 अन्वये दुय्यम निबंधक श्रेणी-1, पारोळा यांचे कडील मुल्यांकन सन 2026-27 नुसार, सदर जमीनीचे सन 2026-27 चे वार्षिक बाजारमुल्य तक्त्यानुसार, हंगामी बागायत मुल्यांकन र. रु. 8,83,851/-येत आहे. सबब सदर मुल्यांकन किमतीच्या 25 टक्के अनर्जित उत्पन्नाची रक्कम रु. 2,20,963/- (अक्षरी दोन लक्ष वीस हजार नऊशे त्र्येसष्ट मात्र) इतकी येते. शासन निर्णय दि. 26/06/2018 नुसार तारण शुल्क आकारणी 250/- करण्यात आली आहे. तारण शुल्क व मुल्यांकन किमतीच्या 25 टक्के अनर्जित उत्पन्नाची अशी एकुण एकंदर र.रु. 2,21,213/-(अक्षरी र.रु. दोन लक्ष एकविस हजार दोनश तेरा मात्र) दिनांक 07/10/2026 रोजी शासकिय पावती क्र. MH011524974202627M अन्वये शासकिय खजिन्यांत जमा करून, जमेच्या चलनाची प्रत व डिफेस चलनाची प्रत तहसिलदार पारोळा यांनी दि. 12/10/2026 रोजी सादर केलेली आहे.
ज्याअर्थी, उपोद्घातातील अ.क्र. 10 वरील अधिसूचनेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 37 अ मध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार शासकीय/नझूल जमिनीच्या हस्तांतरण अथवा विक्री परवानगी देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहे. तसेच उपोद्घातातील अ.क्र. 11 मधील अधिसूचनेनुसार भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे बाबत सुध्दा जिल्हाधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.
यास्तव मी, जिल्हाधिकारी जळगांव, या आदेशान्वये, मौजे पिंपळकोठे ता. पारोळा जि. जळगांव, येथील गट नं.147/27, क्षेत्र 2.02 हे. आर आकार रु.3.60 पैसे या नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनीस कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतर करणेस खालील शर्तीवर मंजूरी देण्यात येत आहे.
अटी व शर्ती
१) जमीनधारक हे प्रश्नाधिन जमीन भोगवटादार वर्ग 1 वर धारण करतील,
२) भविष्यात प्रश्नाधिन जमीनीच्या खरेदी विक्री व्यवहारामुळे महाराष्ट्र शेतजमिन (शेतजमिन धारणेची कमाल मर्यादा) कमी करणे कलम 1961 मधील तरतुदीचा व महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड 2 लगत 3 परिपत्रक क्रमांकशासन ठराव क्रमांक एलएनडी/1083/27925/सीआर/3671/ग 6 दिनांक 8 सप्टेंबर, 1983 मधील तरतुदीचा भंग होऊ नये.
३) भविष्यात हक्काभिलेखासंबंधात काही वाद उद्भवल्यांस त्या वादाची संपूर्ण जबाबदारी जमीन धारकावर राहील.
४) अर्जदाराने अनर्जीत उत्पन्नाची रक्कम तसेच शासनास देय असलेल्या इतर रकमांचा भरणा केलेला असल्याने खरेदीदारांच्या नांवे कबुलायत करण्यात यावी.
५) प्रस्तुत प्रकरणी शासन खजिन्यात भरणा करणेत आलेल्या नजराणा रकमेबाबत भविष्यात फरकाची रक्कम निघाल्यास, सदरची फरकाची रक्कम शासन खजिन्यात भरणा करणे जमीनधारक यांच्यावर बंधनकारक राहिल.
६) प्रस्तुत परवानगी उपवनसंरक्षक जळगाव वनविभाग जळगांव यांच्या उपोदघातातील पत्राच्या आधारे देण्यात येत आहे.
७) प्रस्तुत जमिनीचे भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग । मधील धारणाधिकारातील रूपांतर शासनाकडिल असाधारण क्र.87 मधील दि.08/03/2019 रोजीच्या अधिसूचनेच्या अधिन राहून देणेत येत आहे. प्रश्नाधिन जमिनीबाबत भविष्यात शासन ठरविले ते प्रचलित धोरण जमिनधारक यांच्यावर बंधनकारक राहिल. तसेच सदर निर्णयाच्या अनुषंगाने महसूल दप्तरी नोंद होणेस पात्र राहील.
८) सदरची परवानगी सहायक संचालक, नगररचना जळगांव यांचेकडील झोन दाखल्यानुसार उक्त मिळकत ही ना विकास विभागात स्थित असल्याचे नमुद असल्याने त्यानुसार देण्यात आलेली आहे.
९) जमीनीचे मिळकतदार यांना बिनशेती वापर करावयाचा झाल्यास संभाव्य बिनशेती, बिनशेतीचे मुल्यांकनाची अनजित उत्पन्नाची रक्कम भरणे आवश्यक राहील.
१०) प्रस्तुत जमिनीचे भोगवटादार वर्ग -2 मधून भोगवटादार वर्ग 1 मधील धारणाधिकारातील रूपांतर शासनाकडिल असाधारण क्र.85 मधील दि.04/03/2025 रोजीच्या अधिसूचनेच्या अधिन राहून देणेत येत आहे. प्रश्नाधिन जमिनीबाबत भविष्यात शासन ठरविले ते प्रचलित धोरण जमिनधारक यांच्यावर बंधनकारक राहिल. तसेच सदर निर्णयाच्या अनुषंगाने महसूल दप्तरी नोंद होणेस पात्र राहील.
११) सदर आदेशातील अटी व शर्तीचा भंग झाल्यास, जमीन सरकार दाखल करण्यास पात्र राहील.
१२) संचिकेत उपलब्ध असलेली कागदपत्रे खोटी / चुकीचे / बनावट असल्यास सदरचा आदेश रह होण्यास पात्र राहील.
वरील आदेश प्रमाणे मौजे पिंपळकोठे ता. पारोळा जि. जळगांव, येथील गट नं. 147/27 क्षेत्र 2.02 हे. आर आकार रु. 3.60 पैसे या नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनीस कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतर करणेस आदेश क्र. जमीन 4/33/19/नअश/प्र.क्र/ 168/ 3455834 /2026 जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, जळगांव, दिनांक 24-10-2026 याद्वारे परवानगी देण्यात आली आहे त्यानुसार भोगवटादार वर्ग 1 करण्यात आलेल्या जमीनीबाबत वरीलप्रमाणे गांव दप्तरी नोंद घेण्यात आली.