Ferfar #4997 · आडगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/2
- Talathi
- धिरज शिवाजीराव देशमुख
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अर्जदार श्री. शंकर त्र्यंबक पाटील यांनी सादर केलेल्या अर्जानुसार बाजूस दाखल मौजे आडगाव येथील गट नंबर १९२/२, क्षेत्र १ हेक्टर ६९ आर, आकार ४.८० जमिनीमध्ये दप्तरी फेरफार नोंद क्रमांक ३२९९ (वाटणी ) अन्वये अर्जदार श्री. शंकर त्र्यंबक पाटील यांचा सदर विहिरीमध्ये व पाण्याच्या हक्कामध्ये ९०% (९० पैसे) वडिलोपार्जित हक्क पूर्ववत नोंदलेला होता.
उर्वरित १०% (१० पैसे) विहीर व पाण्याचा हक्क अर्जदार यांनी नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र ३९४/२०१७ संपादन केला असून, त्यानुसार फेरफार नोंद क्रमांक ३६८९ अन्वये सदर १०% हिस्सा खरेदी केल्याची नोंद दप्तरी मंजूर झालेली आहे.
अर्जदार श्री. शंकर त्र्यंबक पाटील यांनी फेरफार क्र. ३२९९ (९०% हक्क) व फेरफार क्र. ३६८९ (१०% खरेदी हक्क) या दोन्ही नोंदींचा आधार घेऊन गट नंबर १९२/२ मधील विहिरीची व पाण्याच्या हक्काची १००% (संपूर्ण) मालकी स्वतःकडे एकट्याकडे असल्याचे सिद्ध केले वरून तसेच . शासनाच्या सोलर कृषी पंप योजना / सौर ऊर्जा लाभासाठी ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कात किंवा पाणी पुरवठा रकान्यात १००% विहीर मालकी नोंद आवश्यक असल्याने त्यांनी विनंती अर्ज सादर केला आहे.
त्यावरून मूळ फेरफार क्र. ३२९९ व क्र. ३६८९ ची दप्तरी खात्री करून, गट नंबर १९२/२ मधील विहिरीचा व त्यावरील पाण्याचा वापर करण्याचा १००% (पूर्ण) हक्क श्री. शंकर त्र्यंबक पाटील यांच्या नावे गाव नमुना ७/१२ वर नोंदविण्यात येत आहे.