Ferfar #4168 · मांदुर्णे
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/1/इ
- Talathi
- शिवाजी दिनकर पाटील
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र जमीन/2/26/नअश/प्र.क्र.२५१/२०२५-२६
आदेश दिनांक : 02/10/2026
म.अप्पर जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील आदेश क्रमांक क्र जमीन/2/26/नअश/प्र.क्र.२५१/२०२५-२६ दिनांक ०२/१०/२०२६ अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
श्री रविंद्र आनंदा पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे मान्दुर्णे ता. चाळीसगाव जि. जळगाव येथील शेत ग. नं. १४८/१/इ चे क्षेत्र ०.९५ हे. आर, पो.ख ०.०० हे.आर.असे एकूण क्षेत्र ०.९५ हे.आर आकार रु ०.९० रु. पैसे या नवीन अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनीस कृषिक प्रयोजनार्थ भोगटवटादार वर्ग -2 मधून भोगवटदार वर्ग -1 मध्ये रुपांतर करणेकामी परवानगी मिळणेस विनती केली आहे.
म.अप्पर जिल्हाधिकारी जळगांव या आदेशान्वये अर्जदार श्री रविंद्र आनंदा पाटील रा मान्दुर्णे ता.चाळीसगाव जि .जळगांव यांना त्यांच्या मालकीच्या मौजे मान्दुरणे ता. चाळीसगाव येथील शेत ग. नं. १४८/१/इ चे क्षेत्र ०.९५ हे. आर, पो.ख ०.०० हे.आर.असे एकूण क्षेत्र ०.९५ हे.आर आकार रु ०.९० रु. पैसे या नवीन अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनीस कृषिक प्रयोजनार्थ भोगटवटादार वर्ग -2 मधून भोगवटदार वर्ग -1 मध्ये रुपांतरकरणेस खालील शर्तीवर परवानगी देण्यात येत आहे.
अटी व शर्ती
1) जमीनधारक हे प्रश्नाधीन जमीन भोगवटादार वर्ग -1 वर धारण करतील
2) उक्त जमिन भविष्यात विक्री करण्यास सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
3) भविष्यात प्रश्नाधीन जमीनीच्या खरेदी विक्री व्यवहारामुळे महाराष्ट्र शेतजमीन ( शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा ) कमी करणे कलम 1961 मधील तरतुदीचा व महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड ३ परिपत्रक क्रमांक २ लगत शासन ठराव क्रमांक एलएनडी/1083/27925/सीआर/3671/ग 6 , दिनांक 8 सप्टेंबर 1983 मधील तरतुदीचा भंग होऊ नये .
4) भविष्यात हक्काभिलेखासंबंधात काही वाद उध्दवल्यास त्या वादाची संपूर्ण जबाबदारी जमीन धारकावर राहील.
5) अर्जदाराने अनर्जीत उत्पनाची रक्कम तसेच शासनास देय असलेल्या इतर रकमांचा भरणा केलेल्या असल्याने खरेदीदारांच्या नांवे कबुलायत करण्यात यावी.
6) प्रस्तुत प्रकरणी शासन खजिन्यात भरणा करणेत आलेल्या नजराणा रकमेबाबत भविष्यात फरकाची रक्कम निघाल्यास, सदरची फरकाची रक्कम शासन खजिन्यात भरणा करणे जमीनधारक यांच्याव बंधनकारक राहिल.
7) प्रस्तुत विक्री परवानगी उपवनसंरक्षक वनविभाग जळगांव यांच्या उपोदघातातील पत्राच्या आधारे देण्यात येत आहे. सदर पत्रातील नमूद तपशील व त्यातील अटी व शर्ती प्रकरणी बधनकारक राहतील.
8) जमिनीचे मिळकतदार यांनी जमिनीचा उपयोग फक्त कृषिक प्रयोजनासाठी करावा. त्याच्या व्यतिरिक्त इतर कारणासाठी उपयोग करावयाचा झाल्यास सक्षम अधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल तसेच अशी परवानगी द्यावयाची ठरल्यास नियमानुसार अनर्जीत उत्पन्नाची रक्कम शासनास अदा करावी लागेल. तलाठी यांनी 7/12 उता-यावर इतर ह्क्की अकृषक रूपांतरणास प्रतिबंध अशी नोंद घ्यावी .
९)सदरची परवानगी सहायक संचालक नगररचना जळगाव यांचेकडील दि १२/०३/२०२६ रोजीचे झोन दाखल्यानुसार उक्त मिळकत हि ना विकास विभागात स्थित असल्याचे नमूद असल्याने त्यानुसार देण्यात आलेली आहे.
१०) जमिनीचे मिळकतदार यांना बिनशेती वापर करावयाचा झाल्यास संभाव्य बिनशेती बिनशेतीचे मुल्यांकनाची अनर्जीत उत्पनाची रक्कम भरणे आवश्यक राहील.
११ )प्रस्तुत जमिनीचे भोगवटादार वर्ग -2 मधून भोगवटादार वर्ग -1 मधील धारणाधीकारातील रुपांतर शासनाकडील असाधारण क्र ८५ मधील दि.0४/0३/२०२५ रोजीच्या अधिसूचनेच्या अधीन राहून देणेत येत आहे. प्रश्नाधीन जमिनीबाबत भविष्यात शासन ठरविले ते प्रचलित धोरण जमिनधारक यांच्यावर बंधनकारक राहिल. तसेच सदर निर्णयाच्या अनुषंगाने महसूल दप्तरी नोंद होणेस पात्र राहील.
१२) सदर आदेशातील तसेच कबुलायतीतील अटी व शर्तीचा भंग झाल्यास, जमीन सरकार दाखल करण्यास पात्र राहील.
१३) अर्जदार यांनी प्रकरणी दाखल केलेली कागदपत्रे खोटी/बनावट अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.
म.अप्पर जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील आदेश क्रमांक क्र जमीन/2/26/नअश/प्र.क्र.२५१/२०२५-२६ दिनांक ०२/१०/२०२६ रोजीच्या आदेशान्वये नोंद केली असे.