सातबारा Watch

← खराडी

Ferfar #1585 · खराडी

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/1
Talathi
महेश वाल्मीक गोरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार चाळीसगाव आदेश क्रमांक : क्रमांक/कुका/ई-टपाल/२०२५/४७०८ आदेश दिनांक : ०८/१०/२०२६ मौजे खराडी येथील गट नंबर ४०/१ चे क्षेत्र १.७० हे आर पोख ०.२१हे आर अशी एकूण १.९१ हे आर आकार र रु.२.८० पै. हि शेतजमीन श्री काळू शंकर चव्हाण,श्री बाळू शंकर चव्हाण व श्री तोळा शंकर चव्हाण रा.खराडी ता चाळीसगाव यांनी धारण केलेली असून सदर शेतजमीन महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ४३ च्या शर्तीस पात्र असल्याने शासन राजपत्र क्र.०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दि.११/०२/२०१४ नुसार कुळकायदा कलम ४३ अशा प्रकारच्या सर्व जमिनी विशेष मोहीम एकत्रित शर्तमुक्त करण्याबाबत निर्देश असल्याने मा तहसीलदार चाळीसगाव यांचा आदेश क्र कुका/ई-टपाल/२०२५/४७०८ दि ०८/१०/२०२६ ने या शेतजमिनीच्या ७/१२ च्या इतर अधिकारातील कु.का.क.४३ प्रमाणे हा शेरा कमी करून व सदर जमीन वर्ग - २ मधून वर्ग – १ करण्यासाठी खालील अटी व शर्तीस अधीन राहून मंजुरी देण्यात येत आहे. अटी व शर्ती 1)सदर शेतजमिनीचा शेती प्रयोजनाव्यतिरिक्त अन्य प्रोयाजनात बदल करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. 2)सदर शेतजमिनीस कुळकायदा कलम ४३ सह अन्य कायद्यातील तरतुदीनुसार सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्यास तशी परवानगी घेणे अर्जदारास बंधनकारक राहील. 3)महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम १९४७ यांच्या तरतुदींचे उल्लंघन केले जाणार नाही. 4)भविष्यात हक्काभिलेखा संदर्भात काही वाद उद्भवल्यास त्या वादाची संपूर्ण जबाबदारी जमीनधारकावर राहील. 5)अर्जदार यांनी प्रकरणी दाखल केलेली कागदपत्रे खोटी / बनावट अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पत्र राहील. याबाबत मा तहसीलदार कार्यालय चाळीसगाव यांचे कडील आदेश क्रमांक क्र कुका/ई-टपाल/२०२५/४७०८ दि. ०८/१०/२०२६ अन्वये नोंद केली असे.