Ferfar #1759 · लाखोली
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/2
- Talathi
- माधुरी गणेश साळुंखे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमीन/1/कावी/50/2026
आदेश दिनांक : 25/05/2026
ज्या अर्थी संतोष निवृत्ती गोतमारे रा. नाचणखेडे, ता. जामनेर, जि. जळगांव यांनी मौजे लाखोली, ता. जामनेर येथील गट नंबर 116/2 क्षेत्र हे.1.22 आर पो.ख.हे.0.00 आर असे एकुण क्षेत्र हे.1.22 आर आकार रु.6.93 पैसे हि शेतजमीन संतोष निवृत्ती गोतमारे वगैरे 5 यांनी सामाईकांत धारण केलेली असुन सदर शेत जमीनीच्या ऑनलाईन 7/12 वरील इतर अधिकारात 1. मथुराबाई शालीकराम यांचे नांव फेरफार नोंद क्र.134 नुसार दाखल असून सदरचे नांव भोगवटादार सदरी घेणे कामी अर्ज सादर केलेला आहे.
फेरफार नोंद नंबर 134 दि. 16/04/1980 नुसार गट नं. 116 चे धारक दयाराम तोताराम गोतमारे हे गांवी दिनांक 16/10/1978 रोजी मयत झालेने त्यांना वारस मुले 2, मुलगी-1 व पत्नी-1 ते पुढीलप्रमाणे - 1. निवृत्ती दयाराम गोतमारे, 2. त्रयंबक दयाराम गोतमरे, 3. मथुराबाई भ्र शालीकराम, 4. गोजराबाई भ्र दयाराम गोतमारे असे वारस असुन अ.क्रं.3 मथुराबाई भ्र शालीकराम यांचे लग्न होवून परघरी राहत असलेने त्यांचे नांव इतर हक्कात दाखल करुन इतर अ.क्रं. 1,2 व 4 यांची नांवे कब्जेदार सदरी दाखल केलेली आहेत. सदरचे मथुराबाई भ्र शालीकराम हे नांव आजरोजी इतर अधिकारात दाखल असुन कब्जेदार सदरी घेणेबाबत अर्जदार यांनी विनंती अर्ज केलेला आहे.
मौजे लाखोली, ता. जामनेर येथील गट नंबर 116/2 क्षेत्र हे.1.22 आर पो.ख.हे.0.00 आर असे एकुण क्षेत्र हे. 1.22 आर आकार रु.6.93 पैसे या शेत जमीनीच्या ऑनलाईन 7/12 वरील इतर अधिकारातील नांव 1. मथुराबाई भ्र शालीकराम हे नांव कब्जेदार सदरी (भोगवटादार सदरी) दाखल होणे कामी नमुद संदर्भ क्र. 04 मधील मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कडील मार्गदर्शक सुचना क्रमांक - 90 रा.भु.अ.आ.का.4/रा.स. / 90 /2018 दि.29/12/2018 मार्गदर्शक सुचना नुसार आदेशित करीत आहे. भविष्यात प्रकरणात न्यायालयीन उद्भवल्यास त्यास अर्जदार हे जबाबदार राहतील.