सातबारा Watch

← शेंदूर्णी

Ferfar #25613 · शेंदूर्णी

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
371/पै/2/ब
Talathi
योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 मौजे शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव येथील गट नं 371/पै/2/ब क्षेत्र 1.11 हे आर आकार रु 6.87 पै ही शेतजमीन श्री प्रकाश तुळशिराम चौधरी व इतर-1,रा शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव यांनी खातेदार म्हणून धारण केलेली असून सदर जमीन भोगवटादार वर्ग 2 ची वर्ग 1 करणे बाबत व कुळ कायदा कलम 43 ची शर्त कमी करणे बाबत म तहसिलदार सो जामनेर यांचेकडेस अर्ज दाखल करणेत आलेला आहे. तरी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय,मुंबई यांचे कडील परिपत्रक क्रमांक टीएनसी/04/13/प्र क्र/196/ज-/दि 7 मे 2014 अन्वये मुंबई कुळ वहिवाट जमीन अधिनियम 1948 चे कलम 73 पुर्व परवानगी अट शिथिल केलेली आहे,तसेच महसुल व वनविभाग यांचे कडील शासन परिपत्रक क्रमांक जमीन -2025/प्र क्र 336/जमीन-01(ई ऑफीस क्र 1379234)दिनांक 16 जुलै 2026 नुसार महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदे (सुधारणा)अधिनियम ,2026(दि.15 एप्रिल 2026 चे राजपत्र )नुसार रद्द करण्यात आली आहे. मौजे शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव येथील गट नं 371/पै/2/ब क्षेत्र 1.11 हे आर आकार रु 6.87 पै या शेत जमीनीबाबत गांव हक्क पत्रकी नोंद नंबर 1237 दि 23/05/1984 नुसार मुळमालक -शांताबाई काळूराम ची वगैरे 3 मयत झाले असून त्यांना वारस मुलगा नाही ,मुली 3 व पती मयत (1.शांताबाई काळूराम 2.शेवंताबाई नामदेव चौधरी 3.कलाबाई रामकृष्ण चौधरी)कुळ भिवसन रामचंद्र दामू रामचंद्र चौ.कुळाने 32 ग प्रमाणे येणारी किंमत 7500/- संपुर्ण भरल्याने 32 एम चे सर्टिफिकेट आलेवरुन कुळाचे नाव इतर हक्कातून कमी केले व कब्जेदार सदरी दाखल केले व मूळ मालकाचे नाव कमी केलेचे दिसुन येते. मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 43 ,हैदाबाद कुळ वहिवाट आणि जमीन अधिनियम 1958 च्या कलम 50 (ब)मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन (विदर्भ विभाग)अधिनियम 1958 कलम 57 परंतुकान्चये उक्त प्रस्तावनेतील परिच्छेद 2 मधील अनुक्रमांक क,ख,व घ तरतुदीच्या अधिन राहुन मौजे शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव येथील गट नंबर 371/पै/2/ब क्षेत्र 1.11 हे आर आकार रु 6.87 पै च्या 7/12 उता-यावरील भुधारणा भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 करणेबाबत तसेच इतर अधिकारातील कुळ कायदा कलम43 ची शर्त हा शेरा कमी करणेबाबत म.तहसिलदार सो जामनेर यांचेकडील आदेश क्र.कुळका/103/2026/E-3227903 दि.19/10/2026 आलेवरून नोंद घेतली असे.