Ferfar #1195 · माक्ता
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मौजे माक्ता येथील गट क्र. 49, 38 व 88 वरील खातेदार नारायण किसन ताठे यांनी रजि. दस्त क्र. 385/2017 दि. 16/09/2017 नुसार दु.निबंधक श्रेणी 1 खामगांव 2 यांचेकडील नोंदणीकृत मृत्युपत्र लिहून दिले आहे ते खालीलप्रमाणे :-
• गट क्र. 38 मधील एकूण 1 हे 15 आर पैकी लागवडीयोग्य 1 हे 15 आर अशी शेती त्यांचा नातू सार्थक प्रमोद ताठे अ.पा.क. आई मिनाक्षी प्रमोद ताठे यांना दिली.
• गट क्र. 49 मधील एकूण 5 हे 32 आर पैकी त्यांच्या हिस्स्याचे लागवडयोग्य 1 हे 32 आर व पो. ख. 0 हे 10 आर शेती ही त्यांचा नातु करण प्रमोद ताठे अ.पा.क. आई मिनाक्षी प्रमोद ताठे यांना दिली, मृत्युपत्र करतेसमयी करण प्रमोद ताठे हे 11 वर्षाचे होते त्यामुळे अ.पा.क. त्यांच्या आई होत्या परंतु अर्जासोबत त्यांनी वयाच्या पुरावा जोडल्यामुळे अ.पा.क. शेरा कमी केला .
• गट क्र. 88 मधील नारायण किसन ताठे यांच्या नावे असलेला सामायिकातील 3 हे 91 आर शेती पैकी अविभाजित 1/4 हिस्सा त्यांनी त्यांची सुन मनोरमा पुरुषोत्तम ताठे यांना दिला.
नारायण किसन ताठे हे दि. 04/09/2020 रोजी मयत झाले असून नोंदणीकृत मृत्युपत्रानुसार नोंद घेण्याकरिता घेतला फेरफार. त्यावरून मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. अर्ज, मृत्युपत्राची प्रत , प्रतिज्ञापत्र , मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.