Ferfar #1411 · अंत्रज भाग -2
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मंडळ अधिकारी , हिवरखेड ता.खामगाव विवादग्रस्त प्रकरण क्र.01/ अंत्रज भाग-2 / 2022-2023 आदेश पारीत दि.13/03/2023 नुसार मौजे अंत्रज भाग दोन येथील गट नं. 593 , 668 , 671 संदर्भात नर्मदाबाई सदाशिव बोचरे यांनी नोंदणीकृत दस्त क्र.2314 दि.14/09/2022 अन्वये गजानन महादेव बोचरे यांच्या नावे दस्त क्र.4609/2014 नुसार करून दिलेले मृत्यूपत्र रद्द करण्याचा नोंदणीकृत दस्त करून दिलेला आहे. गजानन महादेव बोचरे यांनी न्यायालयात यासंदर्भात दाखल केलेले प्रकरण Dismiss in defoult झाले असल्याचे उपरोक्त आदेशात नमूद आहे. तसेच नर्मदाबाई सदाशिव बोचरे यांनी करून दिलेला हक्क सोडल्याचा लेख हा भारतीय नंदानी अधिनियम 1908 नुसार नोंदणीकृत केलेला दस्त असून तो त्यांच्या हयातीत केलेला अंतिम दस्त आहे.असेही सदर आदेशात नमूद असून त्याप्रमाणे फे.क्र.1214 मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर तीन गटांच्या 7/12 च्या ईतर अधिकारातील फे.क्र.1079 नुसार नोंदविण्यात आलेला शेरा "गट नं.668 , 593 व 671 मधील खातेदार नर्मदाबाई ज.सदाशिव बोचरे यांनी आपला पुतण्या गजानन महादेव बोचरे यांच्या नावे दस्त क्र.4606 दि.23.09.14 रोजी मृत्यूपत्र करून ठेवले आहे" हा शेरा कालबाह्य ठरत असल्यामुळे अर्जदार यांचे अर्जानुसार कमी करण्यात आला असे.