Ferfar #28081 · चिखली भाग 1
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे न्यायालया समक्ष.
आदेश क्रमांक : राजस्व प्रकरण क्र.आर.टी.एस-64/चिखली/263/2025-2026
आदेश दिनांक : 14/08/2026
अपीलार्थी :- कुसुम पुरुषोत्तम मेहेत्रे, प्रदिप पुरुषोत्तम मेहेत्रे, प्रतिभा गजानन गाभणे, लक्ष्मी ऊर्फ वेदिका विजय गुंजकर, स्नेहा श्रीकांत झोरे, अर्चना कटाळु जाधव, वर्षा ऊर्फ आम्रपाली ओमप्रकाश शिंदे, अंजली शरद गुंजकर, अविनाश शरद गुंजकर .
विरुद्ध
गैरअपीलार्थी :- 1. ज्योती अविनाश खरात 2. इंदुमती दत्तात्रय मेहेत्रे 3. राजेश दत्तात्रय मेहेत्रे 4. मंगेश दत्तात्रय मेहेत्रे
वरील आदेशान्वये मौजे चिखली भाग 1 येथील स.क्र. 97/5, 55/4, 55/3, 57/5, 75/1ब, 102/4, 102/6, 55/1, 57/3, 59/1ड, 72/4 मधील खातेदार दत्तात्रय लक्ष्मणराव मेहेत्रे यांनी वडीलोपार्जीत जमीनीचे वाटणीपत्र त्यांचे मुले व पत्नी यांना करुन दिले असुन तसेच स.क्र. 97/5 मधील 0.26 हे.आर जमीन त्यांचे भाऊ सुखदेव लक्ष्मण मेहेत्रे यांना सुद्धा वाटुन दिले आहे.
अपीलार्थी यांनी स.नं. 97/5 मधील जमीन दत्तात्रय मेहेत्रे यांची वडीलोपार्जित नसल्यामुळे खालील कोर्टाचा आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे. पंरतु, फेरफार क्रमांक 1725 चे अवलोकन केले असता सदर फेरफारात स.नं. 97/5 सह स.नं. 55/4, 55/3, 57/5, 75/1ब, 102/4, 102/6, 55/1, 57/3, 59/1ड, 72/4 चा सुध्दा समावेश असून मुळ अपीलार्थी यांचा हक्क डावलून वाटणीाबाबत फेरफार क्रमांक 1725 ची नोंद झाल्याची बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे वि.उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांचे कडील राजस्व प्रकरण क्र.आर.टी.एस-64/चिखली/चिखली/फेरचौकशी/80/2012-2013 दिनांक 23/03/2026 चे आदेशात बदल करण्याची आवश्यकता नाही असे आदेशात नमुद आहे. त्यामुळे उक्त जमीनी संबंधातील वाटणी बाबतचा फेरफार क्रमांक 1725 दिनांक 26/05/1995 रद्द करणे बाबतची कार्यवाही करण्यात आली. सबब पुढील उचीत कार्यवाहीस्तव सादर.