Ferfar #2026 · ब्राम्हणवाडा पाठक
चांदुर बा., अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मौजा ब्राम्हणवाडा पाठक येथील खातेदार नामे नीता नंदकुमार मडघे यांनी अर्ज दिल्यावरून मौजा ब्राम्हणवाडा पाठक येथील शेत सर्व्हे क्रमांक 167 मधील क्षेत्र 2.48 हे.आर आणि शेत सर्व्हे क्रमांक 162 मधील 0.41 हे.आर हे शेत त्यांनी मे. विलेजर्स रीनेव्हेबल एनर्जी प्रा.लि. तर्फे देवेंद्रकुमार नंदकिशोर खुळे यांना रक्कम प्रती एक्कर 50000/- रु घेऊन दिनांक 25/06/2026 पासून 28 वर्षाच्या कालावधीसाठी एकूण क्षेत्र 2.89 हे.आर शेतजमीन सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी भाड्याने दिले.तसेच त्यांच्यावर असलेले स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चांदूर बाजार यांचेकडील असलेले शेती कर्ज पूर्ण पणे परत फेड केलेली असून त्यांच्या सात बारा अभिलेख मध्ये असलेला बोजा नोंद कमी करण्यात आली.