Ferfar #1178 · सुकळी (रि) त.सा.क्र. 40 अ
भिवापुर, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.6/एल एन डी.11/2024-25
संदर्भ:महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.जमीन-2025/प्र.क्र.47/ज-1अ दि.22 मे 2025
आदेश दिनांक : 26/09/2025
कोर्ट विद्यमान नायब तहसीलदार ,भिवापूर यांचेकडील वरील संदर्भीय आदेशानुसार खालीलप्रमाणे आदेश करण्यात आलेला आहे.
1)अर्जदार श्री. विजय सदाशिव बागेश्वर व इतर, रा. सुकळी रिठी, यांनी त्यांचे कब्जे मालकीची मौजा- सुकळी रिठी त.सा.क्र. 40 अ येथे सर्वे क्र. 46 आराजी 4.45 हे आर जमा 12.35 भोगवर्ग 1 या शेतीची वहीवाट करिता अर्जदार यांना नांद - बेसूर रस्त्याला लागून गैरअर्जदार नामे अमोल रामकृष्णाजी हिंगणकर व इतर यांचे शेत सर्व्हे क्र. 42 व गैरअर्जदार नामे आनंदाराव कान्हू दांडेकर याचे शेत सर्व्हे क्र. 45 या शेतीच्या संयुक्त धुऱ्याने दोन्ही बाजुने 5-5 फुट असा एकुण 10 फुट रस्ता अर्जदार यांना त्यांच्या शेतीची वहीवाट करण्याकरीता मंजुर करण्यात येत आहे. अर्जदार यांनी सदर रस्त्याने आपले शेतीची वहीवाट करावी यास उपरोक्त गैरअर्जदार यांनी अडथळा करू नये.
2) अर्जदार यांनी आपले शेत सर्व्हे क्र. 46 ची वहीवाट करतांना गैरअर्जदार यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
3) महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाचे शासन निर्णय क्रमांक जमीन- 2025/प्र.क्र.47/ज-1अ दिनांक 22 में, 2025 रोजीच्या आदेशाप्रमाणे सदर रस्त्याची नोंद संबंधित सर्व सातबारा उताऱ्याच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्यात यावी.
4) खर्चा बाबत आदेश नाहीत.