Ferfar #4388 · जांब बु
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- परमेश्वर शिवाजी शिंदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
मौजे जांब बुद्रुक येथील खातेदार प्रकाश पंढरी मगर यांनी सादर केलेला लेखी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखत क्र. ९८१, फेरफार क्र. ३४५, फेरफार क्र. २५९७ व जुना ७/१२ उतारा यावरून खालीलप्रमाणे नोंद घेण्यात येत आहे:
मौजे जांब बुद्रुक येथील जुना सर्व्हे नं. २१ (नवीन गट क्र. ११४) पैकी ० हे. ६० आर जमीन बाबुराव निवृत्ती गवळी राजेंद्र निवृत्ती गवळी यांच्याकडून लक्ष्मीबाई पंढरी मगर यांनी नोंदणीकृत खरेदीखत क्र. ९८१ अन्वये खरेदी केली होती. सदर खरेदीची नोंद महसूल दप्तरी फेरफार क्र. ३४५ अन्वये प्रमाणित झालेली आहे.
त्यानंतर फेरफार क्र. २५९७ अन्वये वाटणी नोंद करताना लक्ष्मीबाई पंढरी मगर यांच्याकडील मूळ खरेदी क्षेत्र ० हे. ६० आर ऐवजी अनावधानाने ० हे. ७३ आर जमीन मुलगा प्रकाश पंढरी मगर यांचे नावे दाखल झाली आहे. त्यामुळे प्रकाश पंढरी मगर यांच्या नावे ० हे. १३ आर क्षेत्र अतिरिक्त नोंद झाले असल्याचे अभिलेखावरून दिसून येते.
सबब, मूळ नोंदणीकृत खरेदीखत व फेरफार क्र. ३४५ ची पडताळणी करून प्रकाश पंढरी मगर यांचे नावे अतिरिक्त आलेले ० हे. १३ आर क्षेत्र कमी करण्यात येत असून, सदर ० हे. १३ आर क्षेत्र गट क्र ११४ मध्ये शिल्लक क्षेत्र म्हणून नोंद ठेवण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.