सातबारा Watch

← आखरगा

Ferfar #1021 · आखरगा

मुखेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-08-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
अविनाश सुरेशराव कोठारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/08/2026 बाजूस वर्णन केलेले गट क्रमांक 146 मध्‍ये खातेदार रामचंद्र लक्ष्‍मण यांच्‍या नावे क्षेत्र 0.51.50 आर, सुर्यकांत लक्ष्‍मण यांच्‍या नावे क्षेत्र 0.51 आर, त्र्यंबक लक्ष्‍मण यांच्‍या नावे क्षेत्र 0.51.50 आर आणि पो.ख. 0.01 आर जमिन मौ.आखरगा ता.मुखेड शेतशिवारात असून त्‍यांनी अर्ज व शपथपत्र देवून विनंती केली की, सदरील गटातील जमिन तहसिल कार्यालयाचा आदेश क्र. 96/अ/भुसुधार-कर दिनांक 24/12/1996 च्‍या तहसिलदार, तहसिल कार्यालय मुखेड यांच्‍या आदेशान्‍वये मौ.आखरगा येथील सर्वे क्र.25/2/B गट क्र. 146 मधील 4 एकर 26 गुंठे ही जमीन है.कू.कायद्याप्रमाणे प्रतिबंधीत मालक म्‍हणून श्री.मल्‍हारी म-या यांच्‍या नावे 7/12 ला अंमल झाला होता, परंतु नंतर लक्ष्‍मण पिराजी (मूळ जमीन मालक) यांनी तहसिल कार्यालयात अर्ज दिल्‍यावरून तहसिल कार्यालयामार्फत चौकशी होवून मल्‍हारी म-या या नावाचा इसम मौ.आखरगा येथे नसल्‍यामुळे व कब्‍जे हक्‍काची किंमत आज पावेतो न भरल्‍यामुळे वरील आदेशान्‍वये सदर कुळाची नोंद रद्द करण्‍यात आली असल्‍यामुळे त्‍यानुसार फेर क्र. 50 अन्‍वये फेरफार घेण्‍यात येवून मूळ जमीन मालक लक्ष्‍मण पिराजी यांच्‍या नावाने दुरुस्‍ती घेण्‍यात आला असल्‍यामुळे मूळ जमीन मालक लक्ष्‍मण पिराजी यांचे नाव सदर गटात नोंद करण्‍यात आले आले नंतर वारसा आधारे त्‍यांची जमनी त्‍यांचे मूलं रामचंद्र लक्ष्‍मण, सुर्यकांत लक्ष्‍मण, त्र्यंबक लक्ष्‍मण यांच्‍या नावे आजरोजी झाली असल्‍यामुळे मूळ हस्‍तलिखित सात बारा नुसार सदर गट भोगवटदार वर्ग 1 करण्‍यात यावे अशी विनंती केली. या अर्जानुसार स्‍थनिक चौकशी व मुळ हस्‍तलिखित सातबारा अभिलेखांची पहाणी केली असता सदर गटाची भूधारण भोगवटदार वर्ग 1 असल्‍याचे दिसून आल्‍यावरून नोंद घेण्‍यात आली. करिता नोंद मंजूरीस्‍तव सादर.