Ferfar #1274 · कुंभारी
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- दत्ता संतराम होनमाने
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
बोजा कमी करणे
पूर्वीची आंध्रा बँक व सध्याची युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा परभणी यांच्या प.पत्रक/क्र. २०२६/१५, दिनांक २४/०६/२०२६ अन्वये मुंजाजी सखाराम जुंबडे यांच्या नावे असलेला कर्ज बोजा कमी करण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे.
सदर पत्रानुसार मौजे कुंभारी येथील गट क्रमांक ७७ वरील संबंधित बोजा कमी करण्यात आला आहे. तसेच, गट क्रमांक ९२ च्या अधिकार अभिलेखातील इतर अधिकार सदरी फे.क्र.६४५ नुसार आंध्रा बँक, शाखा परभणी यांचा मुंजा रु.८०,०००/- व गणा रु.५०,०००/-,गंगा यांच्या नावे रुपये ५०,०००/- असा एकाच ओळीमध्ये नोंदविलेला बोजा असल्याने, केवळ मुंजाजी सखाराम जुंबडे यांचा बोजा कमी करण्याची कार्यवाही करताना तीन्ही नोंदींचा एकत्रित परिणाम होण्याची तांत्रिक अडचण निर्माण झाली.
त्यामुळे, मुंजाजी सखाराम चुंबळे यांचा बोजा कमी करण्याच्या बँकेच्या पत्रानुसार संबंधित बोजा कमी करून, गणा यांच्या नावे रुपये ५०,०००/-,गंगा यांच्या नावे रुपये ५०,०००/- चा बोजा स्वतंत्रपणे नोंदविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
सदर फेरफार नोंद उपलब्ध बँक पत्र व संबंधित अभिलेखांच्या आधारे घेण्यात आली असून, नियमानुसार तपासणी व मंजुरीस्तव सादर.