Ferfar #4714 · देवनांद्रा
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- धम्मपाल चत्रभुज गायकवाड
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र २०२६/जमा-१/कावी-२०६
आदेश दिनांक : 28/10/2026
मौजे देवनांद्रा,ता.पाथरी येथील शेतजमीन गट नंबर ९४, एकूण क्षेत्र ०.९४ हे.आर.ही जमीन भोगवटदार वर्ग-१ ची असून, ती दशरथ बाबासाहेब टेकाळे यांच्या नावावर व्यक्तिगत खाते म्हणून नोंदलेली होती. माननीय नायब तहसीलदार (महसूल-१), तहसील कार्यालय पाथरी यांचे आदेश क्रमांक जा.क्र २०२६/जमा-१/कावी-२०६ दिनांक २८.१०.२०२६ अन्वये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ (२) व महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ नुसार या जमिनीची आपसी सहमतीने कौटुंबिक हिस्से वाटणी मंजूर करण्यात आली आहे.
सदर आदेशानुसार, खालीलप्रमाणे नवीन उपविभाग (पोट हिस्सा) पाडून नवीन खातेदाराचे नाव दाखल करण्यात येत आहे:
१) भागवत दशरथ टेकाळे (खाता नं ९८१९) यांना सदर गट नं.९४ पैकी क्षेत्र ०.५४ हे.आर. व पो.ख ०.०० हे.आर
२) उर्वरित दशरथ बाबासाहेब टेकाळे यांना सदर गट नं.९४ पैकी क्षेत्र ०.४० हे.आर. व पो.ख ०.०० हे.आर यांना कायम राहील.
त्यांचे नाव नवीन हिस्सेदार म्हणून सदर क्षेत्रावर मालक सदरी दाखल करण्यात येत आहे.
(सदर आदेशानुसार इतर हक्कातील जुने संबंधित शेरे व बोजे जसेच्या तसे कायम ठेवण्यात येत आहेत)
अर्जदाराने आदेशातील अटी व शर्ती मधील नं ४ भूमी अभिलेख कार्यालय पाथरी यांचा मोजणी अहवाल फेरफार मंजूर झाल्यानंतर स्वखर्चातून मोजणी अहवाल व पोटहिस्सा मोजणी करून घेतील यासाठी १०० रु स्टंप पेपरवर शपथपत्र दिले आहे.
करिता आदेशावरून नोंद घेतली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.